Bank Account Close Fees: वेगवेगळ्या उद्देशांसाठी प्रत्येकजण बॅंकेत खाते उघडून ठेवतो. मात्र, नंतर ते गोंधळात टाकणारे आणि जास्त खर्चिक होऊन जाते. कारण, मिनिमम बॅलन्स आणि बॅंकांचे अन्य चार्जेस ग्राहकाला द्यावे लागतात. त्यामुळे अधिक बॅंक खाते असल्यास, बरेच जण ते बंद करण्याचा निर्णय घेतात. पण, त्यासाठी देखील चार्जेस द्यावे लागतात. आम्ही तुमच्यासाठी काही मोठ्या बॅंकांच्या चार्जेसची यादी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरुन घेऊन आलो आहोत.
Table of contents [Show]
HDFC बॅंक
तुम्ही एचडीएफसी बॅंकत खाते उघडल्यानंतर 14 दिवसांच्या आत खाते बंद केल्यास कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. तेच खाते 15 दिवस ते 12 महिन्यापर्यंत बंद केल्यास, बॅंक सामान्यांना 500 रुपये चार्जेस आकारते, तर ज्येष्ठ नागरिकांना 300 रुपये चार्ज द्यावा लागतो. मात्र, तुमच्या खात्याला एक वर्ष झाल्यावर तु्म्ही बंद केल्यास तुम्हाला कोणताही चार्ज द्यावा लागत नाही.
SBI बॅंक
तुम्ही एसबीआयचे ग्राहक असल्यास तुम्ही एका वर्षानंतर खाते बंद करणार असाल तर तुम्हाला कोणताही चार्ज द्यावा लागत नाही. मात्र, तुम्ही खाते 15 दिवस ते एक वर्षाच्या आत बंद केल्यास तुम्हाला चार्ज द्यावा लागतो. बॅंक तुमचे बचत खाते बंद करायला 500 रुपये अधिक जीएसटी घेते. त्यामुळे खाते बंद करण्याआधी बॅंकांचा अवधी माहिती असणे गरजेचे आहे.
ICICI बॅंक
आयसीआयसीआय बॅंक खाते उघडल्यानंतर 30 दिवसात बंद करायचे असल्यास कोणतेही शुल्क घेत नाही. पण, तुम्ही जर 31 दिवस ते एका वर्षाच्या आत खाते बंद केल्यास तुम्हाला 500 रुपये चार्ज द्यावा लागणार आहे. तेच एक वर्ष झाल्यानंतर बॅंक खाते बंद करण्यासाठी कोणतेही चार्जेस घेत नाही.
Canara बॅंक
तुम्ही कॅनरा बॅंकेचे ग्राहक असाल तर खाते उघडल्यानंतर 14 दिवसापर्यंत बंद करण्यासाठी कोणतेही चार्ज द्यावे लागत नाही. मात्र, खाते 14 दिवसांपेक्षा जास्त आणि एका वर्षाच्या आत बंद केल्यास 200 रुपये अधिक जीएसटी द्यावा लागतो. तसेच, तुम्ही खाते एका वर्षानंतर बंद करायचा विचार करत असल्यास 100 रुपये अधिक जीएसटी लागू असणार आहे.
असे करा खाते बंद
बॅंक खातेदारांनी बचत खाते बंद करण्यासाठी बॅंकेच्या ब्रांच मॅनेजरला अर्ज द्यावा लागतो. तसेच, पासबुक, चेक आणि डेबिट संबंधित गोष्टी बंद करण्याचे कारण नमूद करावे लागते. याशिवाय तुम्हाला बॅंकेत खाते बंद करायचा फाॅर्मदेखील उपलब्ध असतो. त्यात तुम्हाला बंद करायचे कारण, नमूद करावे लागते.
महत्वाची गोष्ट म्हणजे जेवढे खातेदार असतील त्यांना स्वाक्षरी करणे बंधनकारक असणार आहे. तसेच, यासाठी बॅंक खातेदाराला बॅंकेत हजर राहणे आवश्यक असते. याशिवाय तुमच्यावर काही लोन आणि बिल फेडायचे बाकी असल्यास ते तुम्हाला पूर्ण क्लिअर करावे लागणार आहे.