Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NRI banking with YONO: अनिवासी भारतीयांना बँकिंग होणार गतिमान, SBI ने लॉंच केले खास 'NRI'साठी YONO ॲप

banking

NRI banking with YONO: आपल्या NRI कांसाठी SBI ने नवीन सुविधा आणली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना परदेशातूनही आपले भारतातील बँक खाते उघडण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे . SBI च्या YONO ॲपद्वारे NRI बचत आणि चालू खाती ऑनलाइन उघडू शकतात.

आपल्या NRI ग्राहकांसाठी SBI ने आता नवीन सुविधा आणली असून या सुविधेमुळे ग्राहकांना परदेशातूनही आपले भारतातील बँक खाते सुरु करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. ‘SBI’ YONO ॲपद्वारे  NRI बचत आणि चालू खाते ऑनलाइन सुरु करु शकतात.

अनिवासी भारतीयांसाठी सुविधा

स्टेट बँक ऑफ इंडियाने अनिवासी भारतीयांसाठी सहजतेने बँक खाते सुरु करण्यासाठी  डिजिटल सुविधा सुरू केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने NRE आणि NRO खाती (बचत आणि चालू खाते) SBI च्या YONO ॲपद्वारे सहजतेने उघडण्यासाठी ही डिजिटल सुविधा सुरू केली आहे. ही सेवा बँकेत नवीन  ग्राहकांसाठी तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांना खाते उघडण्याच्या प्रक्रियेत सुलभता आणि कार्यक्षमता मिळते.

NRI बँकिंगसाठी वन स्टॉप सोल्युशन

भारतीय ग्राहकांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता करण्यासाठी हा उपक्रम आहे. SBIने अद्ययावत टेकनॉलॉजीच्या आधारे डिजीटल खाते सुरु करण्याची प्रक्रिया आहे. पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया असल्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत कुठलेही चूक उद्भवण्याची शक्यता राहत नाही. यामुळे हे ॲप म्हणजे NRI बँकिंग गरजांसाठी वन -स्टॉप सोल्युशन बनते.

रिअल टाईम ट्रॅकिंग

या ॲपच्या आधारे ग्राहक त्यांच्या अर्जांची सद्यस्थिती (Real Time Status) रिअल-टाइममध्ये ट्रॅक करू शकतात. त्यामुळे परदेशातील आणि भारतातील वेळांचे गणित जुळवून फॉलो अप घेण्याची चिंता राहणार नाही.

YONO द्वारे तुमचे NRI/NRO खाते उघडण्यासाठीची प्रक्रिया

  • पायरी 1: YONO SBI ॲप डाउनलोड करा.
  • पायरी 2: NRE/NRO खाते उघडण्यासाठी पर्याय निवडा.
  • पायरी 3: यशस्वी सबमिशन केल्यावर, ग्राहकांना त्यांचे केवायसी सबमिट करण्यासाठी दोन पर्याय आहेत.
    पर्याय 1 - भारतातील एसबीआयच्या पसंतीच्या शाखेत कागदपत्र सबमिट करा; 
    पर्याय २ - नोटरी, भारतीय दूतावास, उच्चायुक्तालय, एसबीआय फॉरेन ऑफिस, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिस, कोर्ट मॅजिस्ट्रेट किंवा न्यायाधीश यांच्याकडून केवायसी ( Know Your Customer)दस्तऐवज प्रमाणित करा आणि प्रक्रियेसाठी केंद्राने नियुक्त केलेल्या शाखेत मेल करा.