Bandhkam Kamgar Yojana: बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी सरकारद्वारे विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. बांधकाम कामगार हे असंघटीत क्षेत्रातील सर्वात खालच्या स्तरात येतात. अनेक जण इमारतीच्या बांधकामावर मजूरी करून उदरनिर्वाह करतात. (scholarship scheme of bandhkam kamgar childrens) अशा कुटुंबातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. पहिली पासून ते अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणापर्यंत मंडळाद्वारे शिष्यवृत्ती दिली जाते.
बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी योजना
1)दोन पाल्यांना पहिली ते सातवीसाठी प्रतिवर्ष 2500 रुपये किंवा 8 वी ते 10 वी साठी प्रतिवर्ष 5000 रुपये. योजनेचा लाभ घेण्यासाठी शाळेत 75% हजेरी आवश्यक आहे.
2) दोन पाल्यांना इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी मध्ये 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाल्यास 10,000 हजार रुपये. किमान 50% गुण मिळाल्याची गुणपत्रिका योजनेचा लाभ घेण्याकरिता सादर करावी लागेल.
3) दोन पाल्यांना इयत्ता 11 वी आणि 12 वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष 10 हजार रुपये. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दहावी आणि अकरावीची गुणपत्रिका लागेल.
4) दोन पाल्यांना MSCIT कोर्ससाठी मदत. परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र जमा केल्यास शुल्काची रक्कम माघारी मिळेल.
5) दोन पाल्यांना किंवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्ष 20 हजार रुपये मिळतील.
6) दोन पाल्यांना अथवा कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय पदवी शिक्षणाकरिता 1 लाख रुपये व अभियांत्रिक पदवी अभ्यासक्रमाकरिता 60 हजार रुपये मिळतील.
7) दोन पाल्यांना शासनमान्य पदवीकरिता 20 हजार रुपये प्रतिवर्ष आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी 25 हजार रुपये मिळतील.
योजना क्रमांक 5, 6, 7 साठी मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र/गुणपत्रक तसेच चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याचा बोनाफाइड दाखला लागेल.
सर्व योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
वडीलांचे/पतीचे बांधकाम कामगार असल्याचे ओळखपत्र
बँक पासबुक
रहिवासी पुरावा (आधारकार्ड, शिधापत्रिका, चालू वीज बील, वाहन परवाना किंवा ग्रामपंचायत दाखला)
शाळा-कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचा पुरावा
योजनेचा फायदा फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीला मिळेल.
योजनेच्या लाभासाठी कसा अर्ज कराल?
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. (scholarship schemes for construction workers children) ऑनलाइन अर्ज करताना सर्व कागदपत्रे स्कॅन स्वरुपात अपलोड करावे लागतील. अर्ज मंजूर झाल्यास पैसे थेट बँक खात्यात येतील.