रविवारी 5 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने डिजिटल स्ट्राइक करण्यात आला. यावेळी 138 बेटिंग आणि 94 कर्ज देणार्या अनेक चिनी अॅप्सवर बंदी (Ban on Apps in India) घालण्यात आली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर केवळ चीनच नाही तर अनेक देशांतर्गत अॅप्सवरही परिणाम झाल्याची माहिती मिळाली आहे. अनेक अॅप्सनी या निर्णयानंतर त्यांच्या कामकाजावर परिणाम होत असल्याची माहिती दिली आहे. यापैकी एक लेझी पे (LazyPay) देखील आहे, जे ब्लॉक केले गेले आहे. पे यू (PayU) द्वारे सपोर्टेड LazyPay ने माहिती दिली आहे की त्यांची वेबसाइट आणि अॅपचे काम करणे थांबले आहे आणि ते समस्येचे निराकरण करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलत आहेत. लोन अॅपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांशी गैरव्यवहार होत असल्याची बाब समोर आल्यानंतर या अॅपवर बंदी घालण्याची कारवाई सरकारने केली आहे. सरकारच्या या कारवाईमुळे अँप्सद्वारे कर्ज घेताना काळजी घ्यावी लागणार हेच अधोरेखित होते.
लेझी पे अॅप काय आहे?
लेझी पे (Lazypay) अॅप ग्राहकांना वैयक्तिक कर्ज, Buy Now Pay Later, No Cost EMI आणि Scan and Pay Later यासारख्या ऑनलाइन सुविधा पुरवते. याद्वारे तुम्ही वैयक्तिक कर्ज आणि ईएमआयवर खरेदी करू शकता आणि फ्लिपकार्ट पे लेटर सारख्या पे लेटर सुविधेचा लाभ देखील घेऊ शकता.
किश्त (Kissht) अॅप काय आहे?
अहवालानुसार, Kissht वर देखील याचा परिणाम झाला आहे. Kishsht अॅप हे भारताचे ऑनलाइन कर्ज देणारे अॅप आहे. या अॅपद्वारे ईएमआयवर फ्रीज, टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप यासारख्या वस्तू सहज खरेदी करता येतात. Kissht Loan App प्रामुख्याने 3 प्रकारचे कर्ज देते. ऑनलाइन शॉपिंग, क्विक पर्सनल लोन आणि रिवॉल्विंग लाईन ऑफ क्रेडिट. हे रिव्हॉल्व्हिंग क्रेडिट लिमिट ऑफर करते, ज्यामध्ये तुम्ही तुमची क्रेडिट मर्यादा 2 किंवा 24 महिन्यांत वापरू शकता.
भारतात ‘या’ अँप्सवरही बंदी
यापूर्वी भारताच्या सार्वभौमत्वाला आणि लोकांच्या खासगी आयुष्यातल्या सुरक्षेला या अॅपमुळे धोका असल्याचं सांगत भारतात अनेक अँप्सबर बंदी घालण्यात आली. यामध्ये टिकटॉक, शेअरइट, क्वाई, यूसी ब्राऊजर, बैदू मॅप, शीन, क्लॅश ऑफ किंग्स, डीयू बॅटरी सेव्हर, हॅलो, लाइकी, यूकॅम मेकअप, मी कम्युनिटी, सीएम ब्राऊजर, व्हायरस क्लीनर, एपीयूएस ब्राऊजर, रोमवी, क्लब फॅक्टरी, न्यूजडॉग, ब्युटी प्लस, वीचॅट, यूसी न्यूज, क्यूक्यू मेल, वीबो, झेंडर, क्यूक्यू म्युझिक, क्यूक्यू न्यूजफीड, बिगो लाईव्ह, सेल्फी सिटी, मेल मास्टर, पॅरलल स्पेस, वीसिंक, इएस फाईल एक्सप्लोरर, व्हीवो व्हीडिओ - क्यू यू व्हीडिओ इंक, मेंतू, व्हीगो व्हीडिओ, मी व्हीडिओ कॉल - शाओमी, न्यू व्हीडिओ स्टेटस, डीयू रेकॉर्डर, व्हॉल्ट - हाईड, कॅशे क्लीनर डीयू अॅप स्टुडिओ, डीयू क्लीनर, डीयू ब्राऊजर, हागो प्ले वीथ न्यू फ्रेंड्स, कॅम स्कॅनर, क्लीन मास्टर - चीताह मोबाईल, वंडर कॅमेरा, फोटो वंडर, क्यूक्यू प्लेअर, वी मीट, स्वीट सेल्फी, बायडू ट्रान्सलेट, व्हीमेट, क्यूक्यू इंटरनॅशनल, सिक्युरिटी सेंटर, क्यूक्यू लॉन्चर, यू व्हीडिओ, व्ही फ्लाय स्टेटस व्हीडिओ, मोबाईल लिजंड्स डीयू प्रायव्हसी या अँप्सचा समावेश आहे.