Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bajaj Finserv म्युच्युअल फंड व्यवसायात प्रवेश करणार, सेबीकडून मिळाला परवाना

Bajaj Finserv

Bajaj Finserv: भारताच्या म्युच्युअल फंड उद्योगात 39.62 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. 31 जानेवारी 2023 पर्यंत या क्षेत्रात 42 मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या कार्यरत आहेत. अशातच बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) ही वित्तीय सेवा देणारी कंपनी लवकरच म्युच्युअल फंड व्यवसायात प्रवेश करणार आहे.

हल्ली प्रत्येक व्यक्ती आपल्या हक्काच्या पैशांवर जास्त परतावा मिळावा म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करण्यास प्राधान्य देताना पाहायला मिळत आहे. या वेगवेगळ्या पर्यायांपैकी एक म्हणजे 'म्युच्युअल फंड (Mutual Fund)'. लोकांची वाढती पसंती लक्षात घेऊन बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) ही वित्तीय सेवा देणारी कंपनी लवकरच म्युच्युअल फंड व्यवसायात प्रवेश करणार आहे. यासाठी बाजार नियामक सेबीकडून बजाज फिनसर्व्हला मंजुरी देण्यात आली आहे. बजाज फिनसर्व्ह एमएफचे उद्दिष्ट गुंतवणूकदारांसाठी एक मालमत्ता व्यवस्थापन कंपनी तयार करणे असा आहे. ज्याठिकाणी तंत्रज्ञानाच्या मदतीने गुंतवणूकदार वेगवेगळ्या सेवांचा लाभ घेऊ शकतात.

निमेश चंदन करतील नेतृत्त्व

बजाज फिनसर्व्ह म्युच्युअल फंड (Bajaj Finserv Mutual Fund) लवकरच गुंतवणूक व्यवस्थापक म्हणून बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड (BFAM) सह गुंतवणूकदारांना आपली सेवा ऑफर करणार आहे. या अंतर्गत, एक्टिव्ह आणि पॅसिव्ह अशा दोन्ही विभागांमधील गुंतवणूकदारांना इक्विटी, डेट आणि हायब्रिड फंडांसह म्युच्युअल फंड उत्पादने ऑफर केली जाणार आहेत. कॅनरा रोबेको AMC मधील इक्विटीचे माजी प्रमुख  निमेश चंदन हे BFAM मधील गुंतवणूक व्यवस्थापन कार्याचे नेतृत्व करणार आहेत.

सेबीकडून मिळाली तत्वतः मान्यता

बजाज फिनसर्व्ह कंपनीला म्युच्युअल फंडासाठी सेबीकडून तत्वतः मान्यता मिळाली असल्याचे, कंपनीच्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे. बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज म्हणाले की, “वित्तीय सेवांवरील डिजिटल प्रवेशामुळे म्युच्युअल फंडांची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवणे महत्त्वाचे आहे. बजाज फिनसर्व्हसाठी सेबीची मान्यता ही धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची आहे, कारण ती कंपनीला रिटेल मार्केटमध्ये प्रवेश करण्यास आणि ग्राहकांना आर्थिक सेवा वितरीत करण्यास मदत करेल.

म्युच्युअल फंड उद्योगाला भरारी

भारताच्या म्युच्युअल फंड उद्योगात 39.62 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. 31 जानेवारी 2023 पर्यंत या क्षेत्रात 42 मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या कार्यरत आहेत. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (AMFI) अलीकडेच नोंदवले आहे की, भारतीय म्युच्युअल फंड उद्योगात किरकोळ गुंतवणूकदारांचे स्वारस्य जानेवारीमध्ये 9.3 टक्क्यांनी वाढून 23.4 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.