मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांचे विषय प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा काही महिन्यांपूर्वी 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shaheer) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर लगेचच 30 जूनला 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhari Deva) हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाचे कथानक हे स्त्रियांच्या भावविश्वाभोवती गुंफलेले पाहायला मिळत आहे.
या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, सुचित्रा बांदेकर (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दिपा परब (Deepa Parab) यासारख्या नामांकित अभिनेत्रींनी भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन पाच झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या निमित्ताने चित्रपटाचे बजेट आणि कमाईबद्दल जाणून घेऊयात.
चित्रपटाचे बजेट जाणून घ्या
'बाईपण भारी देवा' (Baipan Bhari Deva) या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. प्रत्येक कुटूंबात केवळ याच चित्रपटाची चर्चा ऐकायला मिळत आहे. यापूर्वी आलेल्या रितेश देशमुखच्या वेड चित्रपटानंतर 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. त्यामुळेच प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहत आहेत. हा चित्रपट 3 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी बाईपण भारी देवाने चित्रपटाचे बजेट क्रॉस केले आहे.
पाच दिवसातील बॉक्स ऑफिसवरील कमाई जाणून घ्या
सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या (Sacnilk Entertainment) रिपोर्टनुसार या चित्रपटाने 30 जून म्हणजेच ओपनिंग डे ला 1.3 कोटी रुपयांचा गल्ला जमावाला. तर रिलीजच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ झाली. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 2.45 कोटी रुपयांची कमाई केली. तसेच तिसऱ्या दिवशी 3.3 कोटी रुपयांचा गल्ला जमवून विकेंडला सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट म्हणून बाईपण भारी देवा चर्चेत राहिला.
सोमवारी या चित्रपटाने 1.20 कोटी रुपयांची कमाई केली. तर मंगळवारी म्हणजे काल या चित्रपटाने 1.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. गेल्या पाच दिवसात चित्रपटाने एकूण 9.75 कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट 10 कोटी रुपयांचा टप्पा यशस्वीरित्या पार करणार आहे.