Patanjali Foods Shares Fall: हिंडेनबर्गच्या रिपोर्टमध्ये अदानी उद्योग समुहाबाबत काही बाबी उघड झाल्यानंतर अदानी उद्योग समुहात्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. त्यापाठोपाठ आता योगगुरू बाबा रामदेव (Ramdev Baba) यांच्या पतंजलि फूड्स लिमिटेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरणीचे सत्र सुरू आहे. पतंजलिच्या शेअर्समध्ये होत असलेल्या घसरणीमुळे या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे 7 हजार कोटी रुपयांचे नुकसान (Patanjali Foods Investor Loss) झाले.
योगगुरू बाबा रामदेव यांनी योग प्रसारासोबत अनेक आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची स्थापना केली आहे. पतंजलिच्या नावाखाली बाबा रामदेव यांनी कंपनी स्थापन केली. यातील पतंजलि फूड्स लिमिटेड ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड झालेली कंपनी आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. भारतातील मोठे उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या विविध कंपन्यांमधील गुंतवणुकीबाबत आणि एकूणच अदानी उद्योग समुहाच्या व्यवहाराबाबत हिंडेनबर्गच्या रिपोर्टमुळे अदानी समुहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली.
शुक्रवारी दि. 3 फेब्रवारीला पतंजलि फुड्सच्या शेअर्सला लोअर सर्किट लावण्यात आले होते. तो 903.35 रुपयांपर्यंत घसरला होता. दिवसअखेर बाजार बंद झाल्यानंतर पतंजलि फूड्सचा शेअर 906.80 रुपयांपर्यंत (Patanjali Foods Share price) पोहोचला होता. सोमवारी दि. 6 फेब्रुवारी पतंजलिचा शेअर 868 रुपयांवर ओपन झाला होता. त्यानंतर तो दुपारी 11.30 च्या दरम्यान 938 रुपयांवर ट्रेडिंग (Patanjali Foods Stock Price Today) करत होता. 25 जानेवारीपासून पतंजलिच्या शेअर्समध्ये घसरण सुरू झाली आहे. त्यादिवशी हा शेअर 1210 रुपयांपर्यंत गेला होता. त्यानंतर मात्र हा शेअर सातत्याने खाली येत आहे.
पतंजलिचे बाजार भांडवल मूल्य 32,825 कोटी रुपये
जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पतंजलिचे बाजारातील भांडवल मूल्य 40 हजार कोटी रुपये होते. त्यात एका आठवड्यात 7 ते 8 हजार कोटी रुपयांनी घसरण झाली. सध्या पतंजलिचे बाजारातील भांडवल मूल्य 32,825 कोटी रुपये इतके आहे. पतंजलि फूड्सने 31 डिसेंबर, 2022 रोजी सादर केलेल्या तिमाही अहवालात कंपनीला 15 टक्के म्हणजे 269 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचे सांगितले होते. त्या अगोदरच्या तिमाहीत 234 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. एकूणच पतंजलिच्या शेअर्समध्ये चांगली वाढ होत असताना अचानक गेल्या आठड्यात यामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली.
मागील 3 वर्षांत दिले छप्परफाड रिटर्न
मागील तीन वर्षांत पतंजलि फुड्सने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले आहेत. पतंजलि उद्योग समूहाची एकूण उलाढाल आगामी 5 वर्षात 1 लाख कोटीपर्यंत वाढवण्याचे टार्गेट बाबा रामदेव यांनी ठेवले आहे. याशिवाय पतंजलिने पाम ऑईलसाठी ताडाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचे नियोजन केले. यातून किमान तीन लाख कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होऊ शकेल, असे बाबा रामदेव यांनी म्हटले होते.