योगगुरु बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली फुड्सने डिव्हीडंडची घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 साठी पतंजली प्रती शेअर 5 रुपये डिव्हीडंड देणार आहे. पतंजली फुड्स लिमिटेडने डिव्हीडंडसाठी 26 सप्टेंबर 2022 ही रेकॉर्ड डेट घोषित केली आहे. त्यामुळे पतंजलीची Ex-Dividend Date 23 सप्टेंबर 2022 आहे. 24 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर 2022 रोजी अनुक्रमे शनिवार आणि रविवार आल्याने शेअर मार्केट बंद असेल. (Patanjali Foods Ltd Ex Dividend Date)
Ex-Dividend Date म्हणजे सर्वसाधारणपणे डिव्हीडंड पात्र ठरण्यासाठी निश्चित केलेला एक दिवस. कंपनीनं डिव्हीडंडसाठी जाहीर केलेल्या रेकॉर्ड डेटपूर्वीचा हा दिवस असतो. अर्थात पुढच्या डीव्हीडंडसाठी पात्र होण्याकरिता गुंतवणूकदाराच्या डिमॅट खात्यात एक्स डिव्हीडंड डेटपूर्वी शेअर असणे आवश्यक आहे.
मागील काही महिन्यात पतंजली फुड्सच्या शेअरची सातत्यपूर्ण कामगिरी राहिली होती. नुकताच पंतजली फुड्सचा शेअर 1,415 रुपयांवर गेला होता. मागील 52 आठवड्यातील शेअरचा हा उच्चांकी स्तर होता. त्यानंतर पतंजलीच्या शेअरला नफेखोरीचा फटका बसला होता. पतंजली फुड्सचा शेअर शुक्रवारी 16 सप्टेंबर 2022 रोजी 1,338.45 वर स्थिरावला होता. कंपनीची मार्केट कॅप 50,000 कोटींवर गेली आहे.
पुढील पाच वर्षात 1,00,000 कोटींपर्यंत उलाढाल वाढवण्याचे टार्गेट
मागील तीन वर्षांत पंतजली फुड्सने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले आहेत. पतंजली समूहाची एकूण उलाढाल 40,000 कोटींचा आसपास आहे. पुढील पाच वर्षात ती 1,00,000 कोटींपर्यंत वाढवण्याचे टार्गेट बाबा रामदेव यांनी ठेवले आहे. याशिवाय तेल ताडाची प्रचंड लागवड (Oil Plams) करण्याचे नियोजन पंतजलीने केले असल्याचे रामदेव यांनी म्हटलं आहे. तेल ताडाच्या लागवडीतून देशांतर्गत खाद्य तेलाचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे खाद्य तेलाची आयात कमी करता येईल आणि त्यातून किमान तीन लाख कोटी रुपयांची परकीय चलनाची बचत होईल, असे बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.
चार कंपन्यांचे IPO आणणार
पंतजली येत्या काही वर्षांत पाच लाख नवीन रोजगार उपलब्ध करणार आहे. यासाठी पतंजली समूह विस्तार करणार आहे. पंतजली समूहातील आणखी चार कंपन्यांचे आयपीओ शेअर मार्केटमध्ये येणार असल्याची माहिती बाबा रामदेव यांनी दिली. पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस, पतंजली लाईफस्टाईल आणि पतंजली मेडिसीन या कंपन्या IPO आणून भांडवल उभारणार आहेत.
जाणून घ्या Ex-Dividend Date आणि Record Date
Ex-Dividend Date : एक्स डिव्हीडंड डेट म्हणजे तुम्ही जर या तारखेनंतर शेअर खरेदी केले तर त्यावर कंपनीकडून दिला जाणारा लाभांश (डिव्हीडंड) मिळणार नााही. डिव्हिडंड मिळण्यासाठी एक्स डेटच्या आधी तो शेअर तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये असला पाहिजे.
Record Date : रेकॉर्ड डेट म्हणजे अशी तारीख ज्या तारखेला कंपनी आपल्या शेअर्स होल्डर्सची यादी नक्की करते म्हणजे ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट अकाउंटमध्ये रेकॉर्ड डेटच्या दिवशी शेअर्स असतील त्याच गुंतवणूकदारांना कंपनी डीव्हीडंड इश्यू करते. थोडक्यात कंपनी रेकॉर्ड चेक करते आणि त्यामध्ये ज्यांची नावे असतात ते डिव्हिडंडसाठी पात्र ठरतात.
Image source: Ruchi Soya's website