अॅक्सिस म्युच्युअल फंडाने ‘अॅक्सिस निफ्टी जी-सेक् सप्टेंबर 2032 इंडेक्स फंडाची (NFO) घोषणा केली. हे एक ‘निफ्टी जी-सेक् सप्टेंबर 2032 इंडेक्स’च्या घटकांमध्ये गुंतवणूक करणारे ओपन एंडेड टार्गेट मॅच्युरिटी डेट इंडेक्स फंड आहे. या फंडात किमान गुंतवणूक 5000 आणि त्यानंतर1 रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल.
निफ्टी जी-सेक् सप्टेंबर 2032 निर्देशांकावर बेंचमार्क केलेले अॅक्सिस निफ्टी जी-सेक् सप्टेंबर 2032 इंडेक्स फंडाचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट निफ्टी जी-सेक सप्टेंबर 2032 निर्देशांकाने दर्शविल्याप्रमाणे खर्चाच्या आधी सिक्युरिटीजच्या एकूण परताव्याशी संबंधित गुंतवणूक परतावा देणे ही आहे. अॅक्सिस निफ्टी जी-सेक् सप्टेंबर 2032 इंडेक्स फंड ही योजना तिच्या पोर्टफोलिओच्या 95% ते 100% निफ्टी जी-सेक् सप्टेंबर 2032 निर्देशांकातील डेट साधनांमध्ये आणि उर्वरित डेट आणि मनी मार्केट साधनांमध्ये वाटप करेल. ही योजना ‘खरेदी करा आणि धरून ठेवा’ (बाय अँड होल्ड) या गुंतवणुकीच्या धोरणाचे अनुसरण करेल, ज्यामध्ये संबंधित निर्देशांकाची डेट साधने जर विमोचन किंवा पुनर्संतुलनासाठी विक्री केली गेली नाहीत तर मॅच्युरिटीपर्यंत ठेवली जातील.हा नव्याने बाजारात येणारा फंड आदित्य पगारिया आणि हार्दिक शहा व्यवस्थापित करतील.
टार्गेट मॅच्युरिटी फंड गुंतवणूकदारांना विशिष्ट मॅच्युरिटी बकेट्स वापरण्याची परवानगी देतात. अशा धोरणाचे पारदर्शक स्वरूप गुंतवणूकदारांना पोर्टफोलिओ आणि साधन मिश्रणाचे स्पष्ट चित्र प्रदान करते. निष्क्रिय फंड म्हणून अॅक्सिस निफ्टी जी-सेक् सप्टेंबर 2032 इंडेक्स फंडाचे उद्दिष्ट नामांकित निर्देशांक प्रदात्यांद्वारे तयार केलेल्या नियुक्त निर्देशांकाची प्रतिकृती बनवणे आहे. टार्गेट मॅच्युरिटी धोरणाच्या ‘मुदतपूर्तीपर्यंत ठेवणे (होल्ड टू मॅच्युरिटी) स्वरूपाचे उद्दिष्ट जे गुंतवणूकदार फंडाच्या संपूर्ण कालावधीपर्यंत गुंतवणूक ठेवतात अशा गुंतवणूकदारांची कालावधी जोखीम कमी करणे हे आहे.
या एनएफओच्या लॉंचबाबत बोलताना अॅक्सिस एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रेश निगम म्हणाले, “सध्याचे उत्पन्न वक्र गुंतवणूकदारांना मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीच्या भौतिक संधी देतोय. अॅक्सिस निफ्टी जी-सेक् सप्टेंबर 2032 इंडेक्स फंड गुंतवणूकदारांना किमान डिफॉल्ट जोखमीसह उच्च दर्जाच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतो. ही नवीन बाजारात आणलेली योजना अॅक्सिस म्युचल फंडाच्या निष्क्रिय डेट ऑफरिंगच्या पोर्टफोलिओमध्ये एक महत्त्वाची भर ठरेल.”न्यू फंड ऑफर (NFO) 6 मार्च ते 13 मार्च 2023 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुले राहील.
सरकारी सिक्युरिटीजमध्ये (जी-सेक) गुंतवणूक
मुळात, सरकारी सिक्युरिटीज किंवा जी-सेक् या ट्रेझरी बिल्स, फ्लोटिंग रेट बॉन्ड्स, झिरो कूपन बॉन्ड्स, कॅपिटल इंडेक्स बॉन्ड्स इत्यादीं सारख्या केंद्र सरकारने जारी केलेल्या सिक्यूरिटीज आहेत. जी-सेक् हे भारतातील डेट बाजारातील सर्वाधिक लिक्विड साधनांपैकी एक मानले जाते.
या फंडातील महत्वाच्या बाबी
- संभाव्य उत्पन्न: चलनवाढ आरबीआयच्या टॉलरन्स बॅंडमध्ये येत असल्याने आता आरबीआयची कडक उपाययोजना आणि नियंत्रण
जवळपास संपत आलेले दिसत आहेत; त्यामुळे या उत्पन्न मिळण्याच्या वक्रामध्ये गुंतवणूक करण्याची ही संधी आहे. - कमी किमतीची निष्क्रिय गुंतवणूक: कमी किंमतीच्या आणि निश्चित उत्पन्न देणाऱ्या उत्पादनाच्या शोधात असलेल्या
गुंतवणूकदारांसाठी पर्याय - सिक्युरिटी निवडीमध्ये कोणताही पक्षपात नाही: फंड निष्क्रियपणे व्यवस्थापित केल्यामुळे आणि निफ्टी जी-सेक् सप्टेंबर 2032 इंडेक्सच्या
घटकांमध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे सिक्यूरिटी निवडीमध्ये कोणताही पक्षपात नाही. - साधे आणि सोपे: निर्देशांकाच्या फायद्यासह टार्गेट मॅच्युरिटी आणि उच्च दर्जाच्या जी-सेक् पोर्टफोलिओ.
या फंडाची ठळक वैशिष्ट्ये
- निफ्टी जी-सेक् सप्टेंबर 2032 इंडेक्सच्या घटकांमध्ये गुंतवणारा ओपन एंडेड टार्गेट मॅच्युरिटी डेट इंडेक्स फंड.
- तुलनेने उच्च व्याजदर जोखीम आणि तुलनेने कमी क्रेडिट जोखीम
- बेंचमार्क: निफ्टी जी-सेक् सप्टेंबर 2032 इंडेक्स
- योजनेची अपेक्षित मॅच्युरिटीची तारीख: 30 सप्टेंबर 2032
- एनएफओ तारीख: मार्च 6 ते मार्च 13 2023
- किमान गुंतवणूक: 5000 आणि त्यानंतर 1 रुपयाच्या पटीत
- एक्जिट लोड: काही नाही (Nil)