Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Axis Bank Rewards Credit Card : अॅक्सिस बँकेने सादर केले रिवॉर्ड्स क्रेडिट कार्ड, स्विगीवर 30% सूट

Axis Bank Rewards Credit Card

Image Source : www.cardinsider.com

देशात डिजिटल पेमेंटचा विस्तार वेगाने होत आहे. मोबाइल रिचार्जपासून ते शॉपिंगपर्यंत लोक डिजिटल पेमेंट करतात. खरेदी करताना तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे काही बक्षिसे आणि कॅशबॅक ऑफरचा देखील फायदा घेऊ शकता.

देशात डिजिटल पेमेंटचा विस्तार वेगाने होत आहे. मोबाइल रिचार्जपासून ते शॉपिंगपर्यंत लोक डिजिटल पेमेंट करतात. खरेदी करताना तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे काही बक्षिसे आणि कॅशबॅक ऑफरचा देखील फायदा घेऊ शकता. जर तुम्ही अँपैरल आणि डिपार्टमेंटल स्टोअर कॅटेगरीमध्ये भरपूर खरेदी करत असाल, तर अँक्सिस बँक रिवार्ड क्रेडिट कार्ड (Axis Bank Rewards Credit Card) तुमच्यासाठी एक उत्तम कार्ड ठरू शकते. अॅक्सिस बँकेने नुकतेच हे कार्ड सादर केले आहे. हे कार्ड कॉन्टॅक्टलेस तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, जे ग्राहकांना 'टॅप आणि पे' ची सुविधा देखील देते म्हणजेच कार्ड स्वाइप न करता फक्त पीओएस मशीनवर टॅप करून पेमेंट करता येते.

स्विगीवर दर महिन्याला दोनवेळा 30% सूट

अँक्सिस बँक रिवार्ड क्रेडिट कार्ड (Axis Bank Rewards Credit Card) सह स्विगीवर खर्च करण्यासाठी महिन्यातून दोनवेळा 30% सूट मिळते. त्यासाठी किमान 200 रुपयांची ऑर्डर करावी लागेल. कार्डधारकाला एका ऑर्डरमध्ये कमाल 150 रुपयांची सूट मिळते.

कार्ड शुल्क

  • अँक्सिस बँक रिवार्ड क्रेडिट कार्ड (Axis Bank Rewards Credit Card) साठी जॉयनिंग फी 1 हजार रुपये आहे.
  • या कार्डची वार्षिक फीसुद्धा 1 हजार रुपये आहे. मात्र, वर्षभरात 2 लाख रुपये खर्च केल्यानंतर वार्षिक शुल्क माफ केले जाईल.

कार्डची प्रमुख वैशिष्ट्ये

  • तुम्ही कार्ड जारी केल्याच्या 20 दिवसांच्या आत 1000 रुपये खर्च केल्यास, तुम्हाला 5000 एज रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.
  • या कार्डद्वारे, तुम्हाला अँपैरल आणि डिपार्टमेंटल स्टोअर कॅटेगरीमध्ये खर्च केलेल्या प्रत्येक 125 रुपयांसाठी 10X रिवॉर्ड पॉइंट मिळतात.
  • या कार्डद्वारे, तुम्हाला प्रत्येक 125 रुपये खर्चासाठी 2 एज रिवॉर्ड पॉइंट मिळतात.
  • एक माइलस्टोन बेनेफिट म्हणून, तुम्हाला बिलिंग सायकलमध्ये 30,000 रुपये खर्च करण्यासाठी 1500 रिवॉर्ड पॉइंट मिळतात.
  • या कार्डद्वारे पेट्रोल पंपांवर 400 ते 5,000 रुपयांच्या इंधन खरेदीवर 1 टक्के इंधन अधिभार भरावा लागणार नाही. बिलिंग सायकलमध्ये जास्तीत जास्त 400 रुपयांचा इंधन अधिभार माफ केला जाऊ शकतो.
  • कार्डधारकाला दर तिमाहीत देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्ये 2 वेळा मोफत राहण्याची संधी दिली जाईल.

Source: https://bit.ly/3IVO9yo