Future Stars Savings Account: लहान मुलांना आर्थिक व्यवहार समजले पाहिजे. बचत खाते, कर्ज, डेबिट/क्रेडिट कार्ड, व्याजदर, म्हणजे काय? बँकेचे व्यवहार कसे चालतात, हे मुलांना लहानपणापासूनच कळावे असे वाटत असेल तर पालक म्हणून तुमची पहिली जबाबदारी आहे. कमी वयातच मुलांना आर्थिक शिस्त लागून बचतीचे महत्व कळेल.
अॅक्सिस बँकेकडून खास लहान मुलांसाठी फ्युचर स्टार बचत खाते सुविधा दिली जाते. जर तुमचे मूल 10 वर्षांपेक्षा लहान असेल तर पालकांसोबत मिळून जॉइंट बचत खाते सुरू करू शकता. दहा वर्षांपेक्षा मोठे मूल असेल तर त्याला स्वत: देखील बँकेचे व्यवहार करता येतील. तसेच या बचत खात्यावर डेबिट कार्डही दिले जाते.
2 लाखांचा अपघात विमा मिळवा
फ्युचर स्टार बचत खाते सुरू करत असाल तर बँकेकडून मुलाला 2 लाखांचा अपघात विमा दिला जातो. पालकांनी मुलाला सोबत घेऊन जर लहानपणापासून असे बँकेचे व्यवहार केले तर त्यांची समज वाढेल. सोबतच स्वत:चे खाते कसे सांभाळायचे. बचतीचे महत्त्वही कळेल. 18 वर्षांपेक्षा लहान मुलांना हे खाते सुरू करता येतील.
फ्युचर स्टार बचत खात्यातून मिळणारे फायदे?
या बचत खात्यावर 3-3.5% व्याजदर मिळेल. तसेच सोबत प्लॅटिनम डेबिट कार्डही मिळेल.
शहरी भागात खात्यातील किमान बॅलन्स 2,500 हजार रुपये आणि ग्रामीण भागात 1 हजार रुपये ठेवावा लागेल.
डेबिट कार्डद्वारे दिवसाला 1500 रुपये काढता येतील.
डेबिट कार्डवर मुलाचे छायाचित्र प्रिंट करता येईल.
खाते ऑनलाइन अर्ज करून सुरू करता येईल. मुलाचे ओळखपत्र, रहिवासी पुरावा, पासपोर्ट साइझ फोटो लागेल.
मुलांना अर्थसाक्षर करण्यासाठी उत्तम पर्याय
लहान मुलांना फक्त पिगी बँकमध्ये पैसे साठवण्याची सवय लावण्यापेक्षा चाइल्ड सेविंग खाते सुरू करणे उत्तम राहील. त्याद्वारे बँकेचे व्यवहार कसे चालतात. एटीएम कार्ड कसे वापरायचे. बँकेत पैसे कसे जमा करायचे हे व्यवहार समजतील. पालकांनी मुलांसोबत बँकेत जाऊन हे व्यवहार केले तर कमी वयात मुलांचे आर्थिक ज्ञान वाढेल. चाइल्ड बचत खाते सुरू करण्याचा मूळ उद्देश मुलांना बचतीची सवय लागावी, आर्थिक व्यवहार समजावेत हा आहे. अधिक माहितीसाठी बँकेच्या संकेतस्थळाला भेट द्या.