या आटोएक्स्पोमध्ये आघाडीच्या वाहन निर्मिती कंपन्या टेक्नॉलॉजी, गाड्यांचे नवनवीन डिझाइन्स आणि फिचर्सचे प्रदर्शन करतील. तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर या एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. ऑटो एक्स्पो - दि मोटार शो नोयडातील इंडिया एक्स्पो मार्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. तर दिल्लीमधील प्रगती मैदानावर ऑटो एक्स्पो कंपोनंनट्स शोचे आयोजन करण्यात आले आहे.
पाहा आटो एक्स्पोमध्ये सहभागी झालेल्या गाड्यांची झलक
Toyota Prius
ऑटो एक्स्पोमध्ये टोयोटा कंपनीने आपली ब्रँड न्यू Prius हे मॉडेल्स सादर केले. या गाडीला फ्लेक्स फ्युअल इंजिन देण्यात आले आहे.
Lexus' diesel SUV, LX
आलिशान कार निर्मिती कंपनी लेक्ससने ऑटो एक्स्पोमध्ये डिझेल इंजिनवर आधारीत SUV कार सादर केली आहे. LX असे या गाडीचे नाव आहे.
ह्युंदाई IONIQ5 EV कार
ह्युंदाई कंपनीने IONIQ5 EV ही कार एक्स्पोमध्ये लाँच केली आहे. ब्लॅक कलरमध्ये या गाडीचा लूक शानदार दिसत आहे.
MG4
MG कंपनीने आपली हायब्रीड श्रेणीतील MG4 ही गाडी एक्स्पोमध्ये लाँच केली.
टोयोटा Land Cruiser LC300
टोयोटा कंपनीने प्रिमियम श्रेणीतील लँड कूझर कार ऑटो एक्सोमध्ये प्रदर्शित केली.