Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Atal Pension Yojana : खातेदाराच्या मृत्यूनंतर नॉमिनीला पेन्शनचा लाभ मिळतो का? काय आहे नियम?

Atal Pension Yojana

अटल पेन्शन योजनेतील (Atal Pension Yojana) खातेदाराचा मृत्यू झाला तर नॉमिनी व्यक्तीला त्याच्या पेन्शनचा लाभ मिळतो की खातेदाराने गुंतवलेली रक्कम त्याला परत केली जाते? या प्रकरणात काय नियम आहे ते जाणून घेऊया.

वृद्धापकाळात पेन्शनद्वारे देशातील सर्व लोकांना नियमित उत्पन्न मिळवून देण्यासाठी भारत सरकार अटल पेन्शन योजना (APY – Atal Pension Yojana) चालवते. जे लोक करदाते नाहीत ते या योजनेत योगदान देऊ शकतात. या योजनेत 18 वर्षे ते 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक गुंतवणुकीसाठी अर्ज करू शकतात. त्यांना वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत योगदान द्यावे लागेल. वयाच्या 60 व्या वर्षांनंतर तुम्हाला 1000 रुपये ते 5000 रुपये मासिक पेन्शन दिली जाते. हे पेन्शन तुमच्या योगदानानुसार ठरवले जाते.परंतु जर खातेदाराचा मृत्यू झाला तर नॉमिनी व्यक्तीला त्याच्या पेन्शनचा लाभ मिळतो की खातेदाराने गुंतवलेली रक्कम त्याला परत केली जाते? या प्रकरणात काय नियम आहे ते जाणून घेऊया.

खातेदाराचा 60 वर्षापूर्वी मृत्यू झाल्यास

जर APY खातेधारकाचा वयाच्या 60 वर्षापूर्वी मृत्यू झाला, तर या प्रकरणात त्याची जमा केलेली रक्कम त्याच्या नॉमिनीला परत केली जाते. परंतु खातेदाराचा जोडीदार जिवंत असेल तर त्याला योजना सुरू ठेवण्याची परवानगी आहे. अशा परिस्थितीत ही योजना सुरू ठेवायची की नाही हे जोडीदारावर अवलंबून असते. जोडीदाराची इच्छा असल्यास, अटल पेन्शन योजनेचे खाते देखील बंद केले जाऊ शकते आणि जमा केलेले पैसे परत घेतले जाऊ शकतात आणि इच्छित असल्यास, खातेदाराला वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत गुंतवणूक कायम ठेवून 60 नंतर आयुष्यभर पेन्शन मिळू शकते.

60 वर्षानंतर मृत्यू झाल्यास

60 वर्षानंतर निवृत्ती वेतनाचा लाभ घेणार्‍या खातेदाराचा मृत्यू झाला तर अशा स्थितीत त्याच्या जोडीदाराला आयुष्यभर पेन्शनचा लाभ दिला जातो. अटल पेन्शन योजना लागू झाल्यानंतर, दुसरा जोडीदार डिफॉल्ट नॉमिनी म्हणून अधिकृत होतो. खातेदाराला जेवढी पेन्शन दिली जाते तेवढीच रक्कम त्याला दिली जाते.

योजनेसाठी अर्ज करा

तुम्हालाही अटल पेन्शन योजनेंतर्गत अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम बँकेत बचत खाते उघडा. जर तुमचे आधीच बँकेत बचत खाते असेल, तर तुम्हाला तेथून योजनेचा अर्ज प्राप्त करावा लागेल. फॉर्ममध्ये नाव, वय, मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक इत्यादी सर्व माहिती अचूक भरा. मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा. यानंतर फॉर्म बँकेत जमा करा. यानंतर तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि अटल पेन्शन योजनेअंतर्गत तुमचे खाते उघडले जाईल.