Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IRCTC Services On Railway Station: रेल्वे स्टेशनवर मिळणार 40 रुपयांत रुम, 'अशी' करू शकता बुकिंग

IRCTC Services

IRCTC Services On Railway Station: प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वेने विशेष सेवा सुरू केली आहे. कन्फर्म तिकिटावर तुम्हाला फक्त 40 रुपयांमध्ये आलिशान खोली मिळू शकते. या 5 स्टार सारख्या खोल्या बुक करण्यासाठी तुम्हाला फक्त 40 रुपये खर्च करावे लागतील.

IRCTC Services On Railway Station:अनेकदा असे घडते की एका ट्रेनमध्ये प्रवास केल्यानंतर दुसरी ट्रेन पकडण्यासाठी थांबावे लागते. अशा परिस्थितीत प्रवाशांना राहण्यासाठी आणि विश्रांतीसाठी खोलीची आवश्यकता असते. पुढच्या ट्रेनसाठी तासन्तास वाट पाहावी लागते तेव्हा खोलीची गरज असते. 20-30 मिनिटे किंवा 1 तासाची वाट असेल तर लोक रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये बसून वेळ घालवतात. पण दीर्घकालीन पर्याय काय आहे?

प्रवाशांची सोय लक्षात घेऊन IRCTC ने विशेष सेवा सुरू केली आहे. कन्फर्म तिकिटावर तुम्हाला फक्त 40 रुपयांमध्ये आलिशान रुम मिळू शकते. या 5 स्टार सारख्या खोल्या बुक करण्यासाठी तुम्हाला फक्त 40 रुपये खर्च करावे लागतील. आजही 99% लोकांना याबद्दल कोणतीही माहिती नाही, त्यामुळे बहुतांश लोक रेल्वेच्या या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

रुम कशी बुक कराल?  (How to Book Room)

रेल्वे स्टेशनवर रूम बुक करण्यासाठी तुम्हाला आधी कन्फर्म तिकीट लागेल. तुम्ही तुमच्या पीएनआर नंबरद्वारे ते बुक करू शकता. यासाठी तुम्हाला रेल्वेच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तुम्ही एसी आणि नॉन एसी रूम देखील निवडू शकता. रूम बुक करण्यासाठी तुम्हाला इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे कन्फर्म तिकीट नसेल तर तुम्ही RAC तिकिटावरही ही सुविधा घेऊ शकता. एका पीएनआर नंबरवर फक्त एक रूम बुक केली जाते. तसेच, ज्याने प्रथम बुकिंग केले आहे त्याला खोली मिळेल. रूम बुक करण्यासाठी तुम्हाला आधार किंवा पॅन कार्डसारखी काही महत्त्वाची कागदपत्रे देखील दाखवावी लागतील.

किती येईल खर्च? (How much Cost) 

रेल्वे स्थानकावर या खोल्यांच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त 20 ते 40 रुपये खर्च करावे लागतील. रेल्वेच्या या सुविधेचा लाभ सर्वसामान्य तिकीटधारकही घेऊ शकतात. तुमचा प्रवास 500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा असणं अनिवार्य आहे. सुविधेचा लाभ प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर निश्चित केला जातो. यासोबतच तुम्ही रेल्वे स्थानकावरील या खोल्यांमध्ये पूर्ण 2 दिवस म्हणजे 48 तास कोणत्याही अडथळ्याशिवाय राहू शकता. तुम्हाला या रिटायरिंग रूम बहुतेक मोठ्या रेल्वे स्थानकांवर मिळतात.

RAC तिकीट म्हणजे काय? 

आरएसी हे एक प्रकारचे वेटिंग तिकीट (Waiting ticket) आहे पण यामध्ये तुम्हाला बसण्यासाठी जागा मिळते. आरएसी म्हणजे रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन. मात्र, यामध्ये एकाच सीटवर 2 जणांना बसावे लागणार आहे. याचा अर्थ असा की जर तुमच्याकडे आरएसी तिकीट असेल तर तुम्हाला झोपायला जागा मिळणार नाही. सहसा ही तिकिटे चार्ट तयार करण्यापूर्वी कन्फर्म होतात.

(News Source: https://kheloharyana.com)