Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Asia Cup 2023 Winners Prize: आशिया कप जिंकलेल्या टीम मिळालं एवढ्या रुपयांचं बक्षिस

ASIA CRICKET CUP 2023 WINNER PRIZE MONEY

Image Source : www.crickettimes.com

Asia Cup 2023 Winners Prize: नुकत्याच झालेल्या आशिया कप स्पर्धेत भारताने श्रीलंकेला नमवून आशिया कप जिंकला. पण तुम्हाला माहितीये का? या कपसोबत भारतीय टीमला किती रुपयांचे बक्षिस मिळाले आहे.

Asia Cup 2023 Winners Prize Money: आशियाई क्रिकेट काऊन्सिल (Asian Cricket Council-ACC)तर्फे आशिया कपचे आयोजन केले जाते. नुकत्याच झालेल्या आशिया कप 2023 चे विजेतेपद भारताने पटकावले आहे. या कपसोबतच भारतीय टीम बक्षिस म्हणून 1.25 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर उपविजेत्या ठरलेल्या श्रीलंकेच्या टीमला 62.35 लाख रुपयांचे बक्षिस दिले.

सर्वाधिक किमतीचे दुसरे बक्षिस

आशिया कप 2023 या स्पर्धेसाठी ACCने 3.4 कोटी रुपयांची बक्षिसे जाहीर केली होती. यावेळी पहिल्या क्रमांकासाठी ज्या रकमेचे बक्षिस ठेवण्यात आले होते. ते आतापर्यंतचे दुसरे सर्वांत मोठे बक्षिस ठरले आहे. एसीसीने यावेळी पहिल्या क्रमांकासाठी 1.25 कोटी रुपयांचे बक्षिस ठेवले होते. यापूर्वी म्हणजे 2018 मध्ये विजेत्या संघासाठी 1.45 कोटी रुपयांचे बक्षिस ठेवले होते.

आशिया कपच्या बक्षिसाची रक्कम एसीसीद्वारेच दिली जाते. एसीसी ही आशिया खंडामधील एक नावाजलेली क्रिकेट संस्था म्हणून ओळखली जाते. त्यामुळे आशिय कपची क्रिकेट जगतात एक वेगळी ओळख आहे. विशेषकरून भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांचा खेळ पाहण्यासाठी येतात. यावर्षीचा आशिया कप हा श्रीलंकेमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि भारताने श्रीलंकेला हरवून हा कप जिंकला आहे. भारताने सातवेळा श्रीलंकेला हरवले आहे. यावेळी विजेत्या संघाला 1.25 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात आले. तर उपविजेत्या संघाला 62.35 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले.

आशिया कप 2023 मधील बक्षिसांची रक्कम आणि विजेते

आशिया कप 2023 मधील प्लेअर ऑफ द मॅच हा किताब भारताच्या मोहम्मद सिराजला देण्यात आला. यासाठी त्याला 5000 डॉलर म्हणजे जवळपास 4.15 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले. त्याचप्रमाणे कॅच ऑफ द मॅचचा किताब भारताच्या रविन्द्र जाडेजा या देण्यात आला आहे. यासाठी त्याला 3000 डॉलरचे (2.50 लाख रुपये) बक्षिस देण्यात आले. तर प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला आहे भारताचा कुलदीप यादव. याला 15,000 डॉलरचे (अंदाजे 12.45 लाख रुपये) बक्षिस देण्यात आले.