Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Army Tender : भारतीय लष्कराचे अशोक लेलँड कंपनीला 800 कोटींचे टेंडर; शस्त्र वाहतुकीच्या वाहनांचा पुरवठा

Indian Army Tender : भारतीय लष्कराचे अशोक लेलँड कंपनीला 800 कोटींचे टेंडर;  शस्त्र वाहतुकीच्या वाहनांचा पुरवठा

Image Source : www.thenfapost.com

भारतीय लष्कराकडून (Indian Army) अशोक लेलँड कंपनीला 800 कोटी रुपयांचे टेंडर मिळाले आहे. यामध्ये अशोक लेलँड कंपनीकडून FAT 4×4, तोफखान्यासाठी वापरला जाणारा ट्रॅक्टर. आणि GTV 6×6 हे लहान आणि मध्यम आकाराच्या तोफा वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा पुरवठा केला जाणार आहे.

भारतीय सैन्य दलात अत्याधुनिक आणि दणकट वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. नुकतेच लष्कराने महिंद्रा कंपनीकडून स्कॉर्पिओ क्लासिक गाड्या खरेदी केल्या आहेत. त्यानंतर आता लष्कराकडून अशोक लेलँड  (Ashok Leyland) या व्यावसायिक वाहन निर्मात्या कंपनीला 800 कोटी रुपयांचे टेंडर देण्यात आले आहे. या टेंडरच्या करारानुसार लष्कराला तोफा वाहून नेणाऱ्या वाहनांचा पुरवठा करण्यात येणार आहे.

ट्रॅक्टर आणि टोईंग व्हेईकलचा समावेश

भारत सरकारकडून लष्करासाठी उपयोगी असणारी वाहने आणि संरक्षण साहित्य भारतीय बनावटीचे असेल याकडे प्रामुख्याने लक्ष देत आहे. ज्यामुळे बाहेरून आयातीचे  प्रमाण कमी होईल. याच पार्श्वभूमीवर अशोक लेलँड कंपनीसोबत 800 कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. यामध्ये अशोक लेलँड कंपनीकडून  FAT 4×4, तोफखान्यासाठी वापरला जाणारा ट्रॅक्टर. आणि GTV 6×6 हे लहान आणि मध्यम आकाराच्या तोफा वाहून नेण्यासाठी वापरले जाणाऱ्या वाहनांचा पुरवठा करण्याचा समावेश आहे. सोमवारी अशोक लेलँडकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

संरक्षण क्षेत्रातील वाहन निर्मितीसाठी सक्षम

अशोक लेलँडचे (Ashok Leyland) व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ शेनू अग्रवाल म्हणाले, “भारतीय लष्कराने या महत्त्वाच्या ऑर्डरसाठी आमच्या कंपनीची निवड केल्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो. संरक्षण क्षेत्रासाठी वाहने तयार करणे हा आमच्या व्यवसायाचा एक मोठा भाग आहे. लष्कराकडून सातत्याने देण्यात येणाऱ्या या ऑर्डरमुळे आम्ही लष्करासाठी वाहने तयार करण्यासाठी सक्षम असल्याचे स्पष्ट होते. आम्ही लष्कराला त्यांच्या गरजेनुसार सर्वोत्तम आणि अत्याधुनिक वाहने देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.

12 महिन्यात वाहनांचे वितरण

अशोक लेलँड दीर्घकाळापासून संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या वाहनांची निर्मिती करत आहे. अशोक लेलँडकडून विविध प्रकारची वाहने बनवली जातात जी लष्करासाठी सैन्य आणि शस्त्र वाहतूक करण्यासाठी उपयोगी ठरतील. तसेच लष्कराने केलेला या 800 कोटी रुपयांच्या करारातील आवश्यक वाहने आम्ही येत्या 12 महिन्यामध्ये वितरीत करणार असल्याचेही अशोक लेलँडच्या संचालकांनी स्पष्ट केले.