Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Paishanvar Bolu Kahi: कर्जतमधील आशा वर्कर, कष्टकरी महिलांचा 'पैशांवर बोलू काही' कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Paishanvar Bolu Kahi Financial Literacy Programe at karjat

Paishanvar Bolu Kahi: 'महामनी'च्या अर्थसाक्षर चळवळीत रायगडमधील कर्जत तालुक्यातील जाम्बरंग येथील आशा वर्कर्स, लघु उद्योग करणाऱ्या कष्टकरी महिला आणि स्थानिक महिलांनी पैशांवर बोलू काही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Paishanvar Bolu Kahi: मराठी भाषा समजणारे, बोलणारे आणि खासकरून मराठीतून व्यवहार करणाऱ्यांना अर्थसाक्षर करण्याच्या उद्देशाने 'महाMoney'या आर्थिक साक्षरतेवर काम करणाऱ्या वेबपोर्टलने सोमवारी 20 मार्च, 2023 रोजी रायगडमधील कर्जत तालुक्यातील जांबरुंग येथील आशा वर्कर्स, लघु उद्योग करणाऱ्या महिला आणि स्थानिक महिलांसाठी 'पैशांवर बोलू काही' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

जांबरुंग पाडामधील स्थानिक मंदिरात दुपारी 2 वाजता महाMoneyचा 'पैशांवर बोलू काही' हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शर्मिला कुन्नुमल यांनी 'महामनी'च्या टीमचे स्वागत केले. या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या महिलांनी अर्थसाक्षरतेशी संबंधित विविध विषयांवरील माहिती जाणून घेत असताना आपल्या प्रश्नांचे निरासन ही करून घेतले.

दैनंदिन जीवनातील जमा-खर्च, बचत आणि गुंतवणुकीच्या साध्यासोप्या टीप्स यावेळी उपस्थित महिलांना 'महामनी'च्या टीमने सादरीकरणासह समजावून सांगितल्या. 'पैशांवर बोलू काही' या कार्यक्रमाची सुरुवात महाMoneyचे टीम मेंबर अक्षय पाटील यांनी केली. त्यांनी महिलांना पैसा किती महत्त्वाचा आहे? संपत्ती म्हणजे काय? या मुद्द्यांना हात घालत महिलांनी बचत कशी करावी, याची माहिती दिली. त्यानंतर वित्तीय सेवा क्षेत्रात दीर्घकाळ काम करणारे आर्थिक साक्षरता प्रशिक्षक दत्तात्रय काळे यांनी दीर्घकाळ संपत्ती निर्मितीचे विविध पर्याय, म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमधील गुंतवणूक, विम्याचे महत्त्व यासारख्या विषयांचे सोप्या भाषेत सादरणीकरण केले. तसेच महिलांनी डिजिटल बँकिंग सेवेचा वापर करताना, काय काळजी घ्यावी. त्याचा वापर कसा करावा, कोणत्या सेवा बँकांकडून दिल्या जातात. तसेच पारंपरिक सोने खरेदीबरोबरच सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे कोणते विविध पर्याय उपलब्ध आहेत.त्यात किती रुपयांपासून आणि कशी गुंतवणूक केली जाते. याची माहिती देण्यात आली. 

Paishanvar Bolu Kahi (Internal Image)
रायगड जिल्हा कर्जत तालुक्यातील जाम्बरंग पाडा येथे पैशांवर बोलू काही कार्यक्रमाला स्थानिक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

त्याचबरोबर डिजिटल आणि ऑनलाईन बॅंकिंगचा वापर करताना लोकांची होत असलेली फसवणूक, सायबर हल्ले आणि ऑनलाईन होणारी आर्थिक फसवणूक कशी टाळावी याविषयी खबरदारीचे उपाय ही सांगितले.

'पैशांवर बोलू काही...' आर्थिक साक्षरतेची चळवळ

पैशांवर बोलू काही हा कार्यक्रम म्हणजे, आयुष्यातील काही दुर्लक्षित आणि भविष्यातील महत्त्वाच्या आर्थिक प्रश्नांविषयी नागरिकांना जागरुक करणे. भविष्याचा विचार करता बचतीचे आणि गुंतवणूक नियोजनाचे महत्त्व काय आहे.पद्धतशीरपणे गुंतवणूक करून आर्थिक उद्दष्ट्ये कशी साध्य होऊ शकतात. याविषयीची माहिती पैशांवर बोलू काही कार्यक्रमातून दिली जाते. महामनी हा उपक्रम एक आर्थिक साक्षरतेची चळवळ म्हणून राबवत आहे.

आपल्याकडे पैशांविषयी एक वाक्य म्हटले जाते की, सर्व गोष्टींचे सोंग करता येते पण पैशांचे सोंग आणता येत नाही. म्हणजेच पैशांचे महत्त्व खूप आहे आणि जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे. तो योग्य पद्धतीने वाढवण्यासाठी, सर्वप्रथम तो साठवणे आणि गुंतवणे गरजेचे आहे आणि हे सर्व करण्यासाठी याविषयीची माहिती असणे गरजेचे आहे. हाच हेतु ध्यानी ठेवून महामनी पैशांची गोष्टी लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

समाजातील प्रत्येक घटकाचा पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. त्यामुळे पैशांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुंतवणुकीचे विविध पर्याय, सरकारी गुंतवणुकीच्या योजना अशी उपलब्ध सर्व योजनांची माहिती या कार्यक्रमातून उपस्थित महिलांना दिली गेली.