Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Paishanvar Bolu Kahi: विक्रमगडमधील महिलांचा आर्थिक साक्षरतेबाबत बुलंद आवाज, 'मी आर्थिक साक्षर होणारच!'

Paishanvar Bolu Kahi Financial Literacy Programe at Vikramgad

Paishanvar Bolu Kahi: विक्रमगडमधील पंचायत समितीच्या कार्यालयात आयोजित केलेला 'पैशांवर बोलू काही' या कार्यक्रम सोमवारी (दि. 4 सप्टेंबर) मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांनी 'मी आर्थिक साक्षर होणारच...' अशी शपथ घेऊन 'महाMoney'च्या आर्थिक साक्षरतेच्या चळवळीला उस्फूर्त प्रतिसाद दिला.

Paishanvar Bolu Kahi: समाजातील प्रत्येक घटकाला आर्थिक साक्षर करण्यासाठी 'महाMoney'ने सुरू केलेल्या 'पैशांवर बोलू काही' हा कार्यक्रम सोमवारी 4 सप्टेंबर, 2023 रोजी विक्रमगडमधील पंचायत समितीच्या सभागृहात पार पडल. या कार्यक्रमाला विक्रमगडमधील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तालुक्यातील महिला बचत गटांच्या प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या महिलांना 'महाMoney'च्या टीमने दैनंदिन जीवनातील बचतीच्या आणि गुंतवणुकीच्या सोप्या टीप्सबाबत मार्गदर्शन केले.  

महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतीने ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमांतर्गत ग्राम स्वयंरोजगार योजना गावागोवी राबवल्या जातात. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आणि महिलांमध्ये आर्थिक साक्षरतेचे प्रमाण वाढावे व त्यांच्यामार्फत आर्थिक साक्षरतेची ही चळवळ गावागावांतील महिलांपर्यंत पोहोचावी. यासाठी विक्रमगड तालुक्यातील उमेदच्या तालुका मिशन व्यवस्थापन कक्षाने 'पैशांवर बोलू काही' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Paishanvar Bolu Kahi Vikramgad Ladies
विक्रमगड पंचायत समितीच्या हॉलमध्ये आयोजित केलेल्या 'पैशांवर बोलू काही' कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला.

विक्रमगड तालुका मिशन व्यवस्थापनच्या मनिषा धाकल भोये (BMM), अर्चना दिवाल पाचलकर (BM-IBCB), नरेश सुरेश जाधव (BM-FI) आणि दशरथ नवसु दागटे (CC) या अधिकाऱ्यांचे कार्यक्रमाच्या आयोजनात 'महाMoney'च्या टीमला मोलाचे सहकार्य मिळाले. विक्रमगडमधील पंचायत समितीच्या कार्यालयात सकाळी 11.30 ते 1.30 या दरम्यान 'पैशांवर बोलू काही' हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. उपस्थित महिलांनी यावेळी 'मी आर्थिक साक्षर होणारच...' अशी शपथ घेऊन आर्थिक साक्षरतेच्या चळवळीला उस्फूर्त प्रतिसाद दिला.

'महाMoney'च्या टीममधील शिवानी राणे यांनी उपस्थित महिलांना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून, पैसा, संपत्ती, गुंवतवणूक अशा बेसिक गोष्टींची माहिती दिली. त्यानंतर संपत्ती म्हणजे नेमके काय, त्याचा उपयोग, बचत आणि गुंतवणुकीमधील फरक काय? गुंतवणुकीचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी सरकारी योजना कोणत्या आहेत? त्यांचे व्याजदर आणि फायदा काय? त्याचबरोबर कर्जाच्या विळख्यात एखादा माणूस कसा अडकतो. तसेच स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी इन्शुरन्सचे (विमा) महत्त्व किती? आदी विषयांची सोप्या भाषेत माहिती आर्थिक साक्षरता प्रशिक्षक दत्तात्रय काळे यांनी दिली.

अंकुश बोबडे यांनी महिलांना डिजिटल बँकिंग म्हणजे काय? तिचा वापर कसा केला जातो? ऑनलाईन आणि डिजिटल बँकिंगचे सध्या उपलब्ध असलेले विविध पर्याय, बँकांमधून कोणत्या प्रकारची सेवा दिली जाते. सरकारी बँका आणि खाजगी बँका कोणत्या? आदी विषयांवर माहिती दिली. तर कैलास रेडिज यांनी सोने खरेदीच्या विविध पर्यायांबद्दल उपस्थित महिलांना माहिती दिली. खासकरून कमीतकमी पैशांत सरकारी कंपन्यांच्या माध्यमातून डिजिटल गोल्ड कसे विकत घेता येऊ शकते. त्याचबरोबर सायबर हल्ल्यातून होत असलेल्या आर्थिक फसवणुकीतून स्वत:चा कसा बचाव करावा, याबाबतची माहिती त्यांनी दिली.

'पैशांवर बोलू काही...' आर्थिक साक्षरतेची चळवळ

पैशांवर बोलू काही हा कार्यक्रम म्हणजे, आयुष्यातील काही दुर्लक्षित आणि भविष्यातील महत्त्वाच्या आर्थिक प्रश्नांविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणारा उपक्रम आहे. भविष्याचा विचार करता बचत आणि गुंतवणूक नियोजनाचे महत्त्व काय आहे.पद्धतशीरपणे गुंतवणूक करून आर्थिक उद्दिष्ट्ये कशी साध्य होऊ शकतात. याविषयीची माहिती पैशांवर बोलू काही कार्यक्रमातून दिली जाते. 'महाMoney' हा उपक्रम एक आर्थिक साक्षरतेची चळवळ म्हणून राबवत आहे.

समाजातील प्रत्येक घटकाचा पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यामुळे पैशांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुंतवणुकीचे विविध पर्याय, सरकारी गुंतवणुकीच्या योजना अशी माहिती या कार्यक्रमातून दिली जाते.