Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Obesity & Insurance: तुमचे वजन जास्त आहे? त्याचा इन्शुरन्स पॉलिसीच्या प्रिमिअमवर काय परिणाम होईल?

Obesity & Insurance

Obesity & Insurance: युनिसेफच्या एका रिपोर्टनुसार, 2030 पर्यंत भारतातील 2.37 कोटी तरुण लठ्ठपणाने त्रस्त झालेला असेल. त्याचा परिणाम तरुणांच्या आरोग्यावर तर होणारच आहे. पण त्याचबरोबर लाईफ इन्शुरन्सच्या प्रीमियमवरही नक्की होऊ शकतो. कसा ते आपण जाणून घेऊ.

Obesity & Insurance लठ्ठपणा अर्थात Obesity ही खऱ्या अर्थाने गंभीर जागतिक समस्या बनत चालली आहे. भारतापुरता विचार करायचा झाला, तर लठ्ठपणाच्या समस्येबाबतची लोकसंख्येची टक्केवारी नक्कीच चिंताजनक आहे. प्रौढ व्यक्तीच नव्हे, तर लहान मुलांच्याबाबतीत देखील ही समस्या गंभीर रूप घेऊ लागली आहे. UNICEFच्या एका रिपोर्टनुसार, 2030 पर्यंत 2.37 कोटी यंग इंडिया (Young India) लठ्ठपणाने त्रस्त झालेला असेल. लठ्ठपणा अनुवांशिक असू शकतो किंवा बदलत्या जीवनशैलीमुळे त्याचा परिणाम होऊ शकतो.

पण लठ्ठ किंवा ओव्हर-वेट असण्याचा परिणाम, मधुमेह (Diabetes), हृदयविकार (heart diseases), उच्च रक्तदाब (hypertension), श्वासोच्छवासाच्या समस्या (respiratory problems) आणि इतर विविध आरोग्य समस्यांना निमंत्रण असते. अर्थातच यामुळे आपले आयुष्य लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही ही समस्या अनुभवत असाल, तर तुम्हाला जास्त वजन असलेल्या लोकांसाठीचा लाईफ इन्शुरन्स खरेदी करण्याचा विचार करणे, आवश्यक आहे. तुमचे वजन तुमच्या लाईफ इन्शुरन्ससाठीच्या प्रीमियमवर नक्कीच कसा परिणाम करू शकते, हे समजून घेणे आवश्यक आहे.

बीएमआय आणि इन्शुरन्स प्रीमिअमचा संबंध काय?

लठ्ठपणा ही अर्थातच एक वैद्यकीय स्थिती आहे. ज्यामुळे आरोग्याचे अनेक धोके निर्माण होऊ शकतात. व्यक्तीचा बॉडी-मास-इंडेक्स (BMI) म्हणजे व्यक्तीचे वजन आणि उंचीचे गुणोत्तर आहे. 30 चा BMI हा लठ्ठपणाची बॉर्डर मानली जाते. जर एखाद्या व्यक्तीचा बीएमआय 25 ते 30 दरम्यान असेल, तर त्याचे वजन जास्त असल्याचे म्हटले जाते. आपले वजन जास्त असल्यास, आपल्याला पॉलिसीचा प्रीमियम थोडा जास्त भरावा लागतो. कारण लाईफ इन्शुरन्स प्रॉडक्ट्सचा प्रिमिअम आपल्या आरोग्यावर, फिटनेसवर, थोडक्यात BMI वर अवलंबून असतो. तेव्हा थोडेसे जास्त प्रीमियम भरून एखाद्या तुलनेने फिट व्यक्तीला दिले जाऊ शकेल, असे लाईफ-कव्हर आपण मिळवू शकतो. अर्थातच, लठ्ठ / ओव्हर-वेट लोकांसाठी ऑफर केल्या जाऊ शकणाऱ्या बेनिफिट्सवर इन्शुरन्स कंपनी काही मर्यादा (Limitations) आणत असते. मात्र तरीही पॉलिसी डॉक्युमेंट्समध्ये समाविष्ट केलेल्या व्याधींवरील उपचारांसाठी, आपल्याला काही प्रकरणांमध्ये आवश्यक असलेले आर्थिक संरक्षण मिळेल.

BMI हे शरीरातील बॉडी-फॅट्सचे म्हणजे मेदाच्या प्रमाणाचे मोजमाप आहे आणि शरीरातील अतिरिक्त फॅट्सशी संबंधित रोगाच्या जोखमीचा (Risk) इंडिकेटर देखील आहे. इन्शुरन्स कंपन्यांमधील अंडररायटर्स BMI स्थिती तपासतातच. कारण प्रीमियम-दर हा पॉलिसीधारकासाठीच्या संभाव्य जोखीमेवर (Risk Profile) अवलंबून असतो. जोखीम जेवढी जास्त, प्रीमियम तेवढा अधिक आकारला जातो. आपले वजन BMI चार्टनुसार जास्त असेल, तर आपल्या इन्शुरन्स-प्रीमियम अधिक महाग होतो.

इन्शुरन्स प्रोडक्टची ऑनलाईन तुलना करा

आता हा प्रीमियम कमी करायचा एक सोपा मार्ग म्हणजे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी ONLINE माध्यमातून खरेदी करणे. इन्शुरन्स उद्योग देखील इतर बाजार-प्रणित उद्योगांप्रमाणेच स्पर्धात्मक होतो आहे. विविध इन्शुरन्स कंपन्यांमधील हीच स्पर्धा आपल्यासाठी फायदेशीर साबित होऊ शकते. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या विविध इन्शुरर्सनी ऑफर केलेल्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीजची ऑनलाइन तुलना करता येणे, सहज शक्य आहे. त्यानंतर आपल्या बजेटमध्ये बसेल, परवडेल (Affordable) असे जास्त वजन असलेल्या व्यक्तींसाठीचे लाईफ इन्शुरन्स प्रॉडक्ट आपण घेऊ शकतो.

डिजिटल माध्यमातून इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केल्याने, आपल्याला पॉलिसी ऑफलाइन खरेदी करण्याच्या तुलनेत, केव्हाही कमी प्रीमियम भरावा लागेल. लाईफ इन्शुरन्सचे संरक्षण आणि आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेऊन, आपण आपल्याला सुयोग्य पॉलिसी घेऊन आपले आणि आपल्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकतो. त्यानंतर लगेचच आपला फिटनेस सुधारणे, वजन नियंत्रणामध्ये आणणे, ह्यावर वर्क-आउट करणे सुरु करू शकतो. अशाप्रकारे, काही वर्षांमध्ये आपण आदर्श असा BMI प्राप्त करण्यास सक्षम असूच. त्यानंतर आपल्याला परवडणाऱ्या प्रीमियमसह, येणाऱ्या तत्कालीन सर्वोत्तम नवीन लाईफ-इन्शुरन्स पॉलिसीसाठी देखील प्रपोजल घेऊ शकतो.