• 31 Mar, 2023 07:55

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Summer Business for Women: उन्हाळ्यात शेतातील कामे बंद आहेत? मग तुम्ही करू शकता 'हे' व्यवसाय

Summer Business for Women

Summer Business for Women: मार्चमध्ये उन्हाचे चटके बसायला सुरू होते आणि बहुतेक शेतातील पिकं सुद्धा नाहीशी होतात आणि मजुरांना काम लागत नाही. मग अशात काय करायचं? तर तुम्ही काही व्यवसाय सुरू करू शकता..

Summer Business for Women: मार्चमध्ये उन्हाचे चटके बसायला सुरू होते आणि बहुतेक शेतातील पिकं सुद्धा नाहीशी होतात आणि मजुरांना काम लागत नाही. काहींच्या घरी नुसतं आठवड्याला मिळणाऱ्या मंजुरीवर सगळं अवलंबून असतं त्यामुळे त्यांना कामाची अत्यंत गरज असते. मग अशा वेळी त्यांची खूप हयगय होते. यातून बाहेर येण्यासाठी उन्हाळ्यामध्ये महिला काही व्यवसाय सुरू करू शकतात ज्याला खर्चही कमी लागेल आणि जागाही. ते व्यवसाय कोणते माहित करून घेऊ.

उन्हाळी कामे 

उन्हाळ्यामध्ये प्रत्येक महिला घरात वर्ष भरातील धान्य, कुरड्या, पापड बनवून ठेवतात. हे प्रत्येकाला जमत नाही. नोकरी करणाऱ्या महिलांना यासाठी वेळ नसतो. त्यामुळे यातून मजुरी करणाऱ्या महिलांसाठी ही एक चांगली संधी असते. 

papad-maker.jpg
http://www.forbesindia.com/

नोकरी करणाऱ्या महिलांचे ऑर्डर घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी लागणारे गहू, ज्वारी, तांदूळ, बटाटे आणि आणखी काही साहित्य.. तुम्ही ग्राहकांकडून आधीच काही पैसे घेऊन हे साहित्य आणू शकता आणि या व्यवसायाला सुरवात करू शकता.

आइसक्रीम पार्लर

उन्हाळ्याच्या दिवसात बहुतेक खेडेगावात आइस क्रीम मिळत नाही. बाहेर गावी जाण्यासाठी प्रत्येकाला जमत नाही. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला लागणारा फ्रीज तुम्ही EMI वर खरेदी करू शकता. आणि याला जागाही जास्त गुंतली जात नाही. 

ice-cream-parlor.jpg
http://www.facebook.com/

सर्वात आधी माल घेण्याकरिता तुम्हाला काही भांडवल लागेल नंतर दुसऱ्या वेळेला तुम्हाला आलेल्या नफ्यातून तुम्ही आइसक्रीम साहित्य आणू शकता. घरी बसून उन्हाळ्याचे काही दिवस तुम्ही आरामात काढू शकता.

लग्नातील रुखवंदाचे सामान

लग्नसराईमध्ये लागणारे रुखवंदाचे सामान जितके आकर्षक असेल तितकीच त्याची किंमत वाढवली जाते. मग तुमच्या जर हातात हा गुण असेल तर तुम्ही व्यवसाय सुरू शकता. लग्नातील साहित्य घेण्याकरिता वेगवेगळ्या दुकानात जाऊन घेणे शक्य नसते त्यामुळे कोणीही हाच पर्याय योग्य ठरवतील. 

wedding-rukhvat.jpg
http://www.youtube.com/

फळांची सजवलेली बास्केट, विविध प्रकारच्या फोटो फ्रेम आणि बरेच काही यात घेत येऊ शकते. यासाठीही तुम्हाला सुरवातीला तुम्हाला काही भांडवल लागेल. त्यासाठी तुम्ही बचत गटाकडून कर्जसुद्धा घेऊ शकता. यातून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस

शाळेला सुट्टी असल्याने अनेक मुली क्लासेसचा विचार करतात. काहींना आर्ट अँड क्राफ्टमध्ये इंटरेस असतो, त्यांच्या सोयीसाठी आणि तुमच्या उत्पन्नासाठी तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्यात जर आर्ट आणि क्राफ्ट करण्याचा सुप्त गुण असेल तर तुम्ही नक्कीच हा व्यवसाय सुरू करून यशस्वी होऊ शकता. 

art-and-craft-classes-for-girls.jpg
http://www.atlasobscura.com/

यामध्ये पायदान बनवणे, तोरण बनवणे, घरातील शोभेच्या वस्तु बनवणे इत्यादींचा समावेश होतो. यातून तुम्ही महिन्याला 10 ते 12 हजार रुपये कमाई करू शकता.