Business Idea: हल्ली मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा(Plastic) वापर वाढला आहे. 2021-2022 या आर्थिक वर्षात(Financial Year), संपूर्ण भारतातील एकूण प्लास्टिकची मागणी(अभियांत्रिकी प्लास्टिक आणि थर्मोसेट्स वगळून) अंदाजे 15 दशलक्ष टन इतपत होती, त्यापैकी पॉलीथिलीनचे प्रकार अंदाजे सहा दशलक्ष मेट्रिक टन इतके होते. आता यावरून तुम्हाला लक्षात येईल की फक्त भारतातचं आपण किती मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा वापर करतो. सिंगल यूज प्लास्टिकच्या व्यवसायाशी(Single Use Plastic Business) बरेच लोक जोडले गेले आहेत. सरकारकडून वेळोवेळी त्यावर पुर्णपणे निर्बंध घालण्यात येत आहे. त्यामुळेच आता या व्यवसायात गुंतलेल्या लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच 'Mahamoney' ने तुमच्यासाठी कमीत कमी गुंतवणुकीत काही बिझनेस आयडिया(Business Idea) आणल्या आहेत.
बारा बलुतेदारीमध्ये कुंभारकाम(Poetry Business) हा अतिशय महत्त्वाचा व्यवसाय होता. प्लास्टिक ऐवजी पर्यावरण पूरक अशी मातीची भांडी वापरणं केव्हाही चांगल. यूज अँड थ्रो प्लास्टिक(Use & Throw Plastic) वस्तूंना पर्याय म्हणून मातीच्या कुल्लडचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यासाठी तुम्हाला फक्त 5000 रुपये गुंतवून सुरूवात करायची आहे. चहाच्या प्लास्टिक कपांना (Plastic Tea Cup) पर्याय म्हणून हल्ली कुल्लडची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. त्यामुळे कमी खर्चात सुरू होणाऱ्या या उद्योगाला मोठी मागणी आहे. चला तर आज या व्यवसायाबद्दल जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
केंद्र सरकार कडून करण्यात येईल मदत
केंद्र सरकार(Central Government) कडून वेळोवेळी उद्योग जगताला कमीत कमी प्लास्टिकचा वापर करा असा सल्ला देण्यात आला आहे. सरकारकडून या संदर्भातील वेगवेगळी पाऊले ही उचलण्यात आली आहेत. कुल्लड या व्यवसायासाठी सरकार वीजेवर चालणारे चाक(Electric Wheel) व्यावसायिकांना देणार आहे. याशिवाय हे कुल्लड चांगल्या किंमतीला खरेदी करण्याकरिता देखील व्यावसायिकांना मार्गदर्शन आणि मदत करणार आहे.
यासाठी कच्चा माल कोणता?
कुल्लड बनविण्याच्या व्यवसायासाठी कच्चा माल(Raw Material) हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. या कच्च्या मालावरचं तुमच्या उत्पादनाची गुणवत्ता(Product Quality) समजते. या व्यवसायासाठीचा कच्चा माल म्हणजे चांगल्या प्रतीची माती(Soil). ही माती तुम्हाला नदी किंवा तलावात मिळते. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुल्लड बनविण्याचा साचा. हा साचा अतिशय महत्त्वाचा असतो. तो तुम्हाला कोणत्याही बाजारात उपलब्ध होऊ शकतो. कुल्लड बनविल्यानंतर भट्टीत भाजले जाते त्यासाठी भट्टीची ही आवश्यकता आहे.
यातून किती कमाई होऊ शकते?
कुल्लड सर्वात स्वस्त आणि पर्यावरण पुरक उत्पादन आहे. हल्ली मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये याचा वापर ग्राहकांना खुश करण्यासाठी किंवा चवीसाठी सुद्धा केला जातो. या उत्पादनाचा पुनर्वापर होत असल्याने प्लास्टिकच्या तुलनेत व्यावसायिक याकडे मोठ्या प्रमाणावर झुकत आहेत. सध्या चहासाठी वापरले जाणारे कुल्लड 50 रुपये शेकड्याने खरेदी केले जाते. तर लस्सीचा कुल्लड हा 150 रुपये शेकड्याने खरेदी केला जातो. थंडगार पाणी पिण्यासाठी वापरला जाणारा कुल्लड 100 रुपये शेकड्याने खरेदी केला जातो. ज्यावेळी संपूर्ण प्लास्टिक बंद होईल त्यावेळी या व्यवसायाची मागणी वाढेल आणि अजून चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.
कोणत्या व्यावसायिकांकडून खरेदी केला जाईल कुल्लड?
हल्ली ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी किंवा पदार्थाला मूळ चव(Main Taste) निर्माण करण्यासाठी कुल्लड पुन्हा एकदा वापरात आले आहे. पुनर्वापर(Reuse) शक्य असल्याने आईस्क्रीम पार्लर, ताक किंवा लस्सी विकणारा विक्रेता, चहावाले इत्यादी व्यावसायिक तर हमखास याची खरेदी करत आहेत.