Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hindustan Pencils Private Limited: अप्सरा, नटराजच्या पेन, पेन्सिल आहेत एकाच कंपनीची उत्पादनं

Hindustan Pencils Private Limited

Image Source : www.hindustanpencils.com

शालेय विद्यार्थ्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व व्यक्तींच्या हातात दिसणाऱ्या अप्सरा आणि नटराजच्या पेन, पेन्सिलचे उत्पादन करणाऱ्या हिंदुस्थान पेन्सिल प्रायव्हेट लिमिटेड (Hindustan Pencils Private Limited) या कंपनीच्या उत्पादनांविषयी माहिती मिळवणार आहोत.

तुम्हाला माहीत आहे का? शालेय विद्यार्थ्यांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या अप्सरा आणि नटराज या ब्रँडच्या पेन-पेन्सिल या एकाच कंपनीचे उत्पादन आहेत. त्या कंपनीचे नाव आहे हिंदुस्थान पेन्सिल प्रायव्हेट लिमिटेड (Hindustan Pencils Private Limited). 1958 मध्ये या कंपनीची स्थापना झाली. आज भारतात मोठ्या प्रमाणात पेन्सिल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये हिंदुस्थान पेन्सिल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अग्रस्थानी पोहचली आहे. जवळपास प्रत्येक भारतीयाच्या मुखी नाव असलेल्या या ब्रँडने जागतिक स्तरावरही लोकप्रियता मिळवली आहे.

नटराज आणि अप्सरा (Nataraja and Apsara)

अप्सरा, नटराजच्या पेन, पेन्सिलच्या उत्पादनांसाठी कंपनीकडून अनेक वर्षांचे संशोधन आणि गुणवत्ता यांचा वापर होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीच्या स्थापनेपासून 1970 पर्यंत कंपनीचा केवळ एकच ब्रॅंड होता तो म्हणजे ‘नटराज’. त्यानंतर या क्षेत्रातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी 1970 मध्ये कंपनीकडून ‘अप्सरा’ हा नवीन ब्रॅंड बाजारात दाखल करण्यात आला. भारतातील 5 वेगवेगळ्या ठिकाणी कंपनीचे 10 कारखाने पसरलेले आहेत. आजघडीला कंपनी दररोज 85 लाख पेन्सिल, 17 लाख शार्पनर आणि 27 लाख खोडरबरची विक्री करत आहे.

कंपनीचे मिशन (Company Mission)

जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त स्टेशनरीसह ग्राहकांना आनंदित करणे या मिशनद्वारा कंपनी पुढील वाटचाल करत आहे. “हिंदुस्तान पेन्सिल आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्पादनांचे उत्पादन आणि मार्केटिंग करण्यासाठी कटिबद्ध आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षा नियमांची पूर्तता करण्यासाठी कंपनीकडून सातत्याने प्रयत्न केले जातात,” असे कंपनीचे म्हणणे आहे.

कंपनीचे पर्यावरण धोरण (Company's Environmental Policy)

कंपनीच्या पर्यावरणीय धोरणाबाबत बोलायचे झाल्यास, “पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी प्रक्रियांमध्ये सतत सुधारणा करणे आणि इनपुटचा जास्तीत जास्त वापर करणे यावर कंपनीचा विश्वास आहे. कंपनीने वापरलेले सर्व घटक निसर्गात बिनविषारी आहेत. पेन्सिलसाठी लाकूड हे मुख्य इनपुटपैकी एक असल्याने, कंपनी वृक्षारोपण विकसित करण्याची” हमी कंपनी देते. पेन्सिल तयार करण्यासाठी जंगलाचे लाकूड न तोडता जे शेतकरी त्यांच्या शेतात, जमिनीवर किंवा त्यांच्या निवासस्थानाच्या अंगणात झाडे लावतात त्यांच्याकडून कंपनी लाकूड खरेदी करते. हे जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरण संतुलन राखण्यास मदत करते. प्रक्रिया सुधारण्यासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी इनपुटचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी कंपनीकडून सतत प्रयत्न केले जातात.

कंपनीची ‘ही’ उत्पादनं सध्या बाजारात

हिंदुस्थान पेन्सिल प्रायव्हेट लिमिटेड ची नटराज आणि अप्सरा या दोन प्रमुख उत्पादनांच्या पेन्सिल्स, प्रोफेशनल पेन्सिल्स, इरेजर्स, शार्पनर्स, स्केल्स, इनस्ट्रूमेंट सेट्स, खडू, कीट्स, कलर पेन्सिल्स, आर्ट मटेरियल आणि पेन्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत.