राज्यातील आर्थिकदृष्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्यशासनाच्या अखत्यारित काम करणाऱ्या सारथी संस्थेच्या वतीने विविध योजना राबवल्या जात आहेत. त्याच प्रमाणे देशातंर्गत उच्च शिक्षणासाठी सारथी कडून डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती (dr.Panjabrao Deshmukh Scholarship) दिली जात आहे. या शिष्यवृत्तीसाठी सारथीने विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत. या शिष्यवृत्तीच्या नियम व अटी अर्जाची प्रक्रिया याबाबतची माहिती आपण आज जाणून घेऊयात...
Table of contents [Show]
डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती 2023-24
सारथी या संस्थेकडून राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास मराठा, कुणबी, कुणबी-मराठा या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख ही शिष्यवृत्ती देण्यात येते. 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता पात्र विद्यार्थ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.ही शिष्यवृत्ती देशांतर्गत शैक्षणिक संस्थामधील विविध उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय सारथी संस्थने घेतला आहे. या शिष्यवृत्तीसाठी देशातील 200 नामांकित शैक्षणिक संस्थाचा समावेश करण्यात आला आहे.
शिष्यवृत्तीचे स्वरुप -
डॉ. पंजाबराव देशमुख उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेने निवड केलेल्या 200 शैक्षणिक संस्थापैकी ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे, त्याचे शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, वसतिगृह शुल्क, भोजन खर्च, इत्यादी शुल्क शिष्यवृत्तीच्या माध्यमातून दिले जाते यासाठी विद्यार्थ्यांने शिष्यवृत्तीसाठी दिलेल्या नियम अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
पात्रतेचे निकष-
सारथी कडून देण्यात येणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न 8 लाख रुपयांच्या आत असावे. विद्यार्थ्याने उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्याचे संस्थेचे पत्र यासह शैक्षणिक शुल्कासंदर्भातील आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. यासह इतर माहितीसाठी विद्यार्थ्याने सारथीच्या संकेतस्थळावर भेट द्यावी.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि मूदत
डॉ. पंजाबराव देशमुख उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याने संस्थेच्या https://admin.sarthi-maharashtragov.in/auth/login या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) 30 ऑक्टोबर 2023 आहे. तसेच ऑनलाईन अर्जाची प्रत आणि साक्षांकित कागदपत्रे (Hardcopy) 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत सारथी संस्थेकडे पाठवायची आहेत. या बाबतचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी संकेतस्थळावरील जाहिरात पाहावी. (https://sarthi-maharashtragov.in/notices)