ॲपल (Apple) कंपनी त्यांच्या वेगवेगळ्या उत्पादनांची विक्री जगभरात करते. त्यांच्या अनेक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांपैकी एक उत्पादन म्हणजे मॅकबुक (Macbook). कंपनीने पहिल्यांदाच 15 इंचाचा मॅकबुक लॉन्च केला आहे. सोमवारी वल्डवाईड डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये 15 इंचाचा ‘Macbook Air’ लॅपटॉप लॉन्च करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे 15 इंचाचा हा लॅपटॉप सगळ्यात कमी जाडीचा लॅपटॉप असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. याची जाडी 11.5 मिमी इतकी असून त्याचे वजन 1.36 किग्रॅ इतके आहे. या नवीन लॅपटॉपची किंमत किती? हा कुठून खरेदी करता येईल आणि यामध्ये कोणते फीचर्स खास आहेत,जाणून घेऊयात.
Macbook air ची किंमत किती?
ॲपल कंपनीचा Macbook air सोमवारी लॉन्च झाला आहे. या लॅपटॉपसाठी ग्राहकांना 1 लाख 34 हजार 900 रुपये मोजावे लागणार आहे. ॲपल कंपनी शिकाऊ विद्यार्थाना यामध्ये थोडी सूट देत आहे. ही सूट पकडून त्याची किंमत 1 लाख 24 हजार 900 रुपये होत आहे. शैक्षणिक कामकाजासाठी खरेदी केलेल्या लॅपटॉपवर विद्यार्थ्यांना 10,000 रुपयांची बचत होणार आहे.
कुठून खरेदी करता येईल?
सध्या भारतात ॲपल कंपनीचे दोन स्टोअर उभारण्यात आले आहेत. मुंबई (Mumbai) आणि नवी दिल्ली (Navi Delhi) येथे हे स्टोअर्स असून यातून ग्राहक Macbook air ची खरेदी करू शकतात. याशिवाय कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून देखील लॅपटॉपची खरेदी करता येऊ शकते. 13 जून 2023 पासून ग्राहकांना नवीन लॅपटॉप खरेदी करता येईल.तसेच कंपनीच्या अधिकृत रिसेलर्सकडून देखील ग्राहकांना लॅपटॉपची खरेदी करता येणार आहे.
फीचर्स बद्दल जाणून घ्या
Macbook air च्या लॅपटॉपमध्ये कंपनीने M2 चीप बसवली आहे. कंपनीचा असा दावा आहे की, इंटेलची चिप वापरलेल्या सर्वाधिक फास्ट लॅपटॉपपेक्षा 12 पटीने जलद काम करण्यासाठी Macbook air मदत करेल.
हा लॅपटॉप चार वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे. यामध्ये मिडनाईट (Midnight), स्टारलाईट (Starlight), सिल्वर (Silver) आणि स्पेस ग्रे (Space Grey) रंग उपलब्ध आहे.
याचा डिस्प्ले हा लिक्विड रेटिनाचा असून हा 15 इंचाचा लॅपटॉप आहे. यामध्ये 6 स्पीकर असणारी साउंड सिस्टीम देण्यात आली आहे.
याशिवाय 1080mp रिजोल्यूएशन असणारा एचडी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यामध्ये मॅकसेफ चार्जिंग सिस्टीम देखील देण्यात आली आहे.
Source: hindi.moneycontrol.com