बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंटनं (Bajaj finserv asset management) पहिली इक्विटी स्कीम सुरू केली आहे. ही एक ओपन-एंडेड इक्विटी स्कीम (Open ended equity scheme) आहे. मेगाट्रेन्ड्स (Megatrends) धोरणावर आधारित विविध मार्केट कॅपमध्ये इक्विटी आणि इक्विटी संबंधित पर्यायांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणं हा याचा उद्देश आहे. गुंतवणुकदार त्या सर्व मेगाट्रेन्ड्सचा लाभ उठवू शकतात, ज्याला त्यांचे इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट, सेक्टर, थीम, मार्केट कॅपिटलायझेशन आणइ जिओग्राफीजमध्ये पाहतात.मागच्या कामगिरीकडे पाहण्याऐवजी, बजाज फिनसर्व्ह एएमसीमधली गुंतवणूक टीम त्या मेगाट्रेंडवर लक्ष केंद्रित करते.
Table of contents [Show]
बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंट स्कीम - काही ठळक बाबी :
- हा एनएफओ 24 जुलै 2023 रोजी उघडणार असून 7 ऑगस्ट 2023 रोजी बंद होईल
- या योजनेचा उद्देश मेगाट्रेंड ओळखणं आणि लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप स्टॉक्समधल्या गुंतवणुकीच्या संधी ओळखणं.
- ही योजना लॉन्ग टर्म, मल्टी थिमॅटिक, मल्टी कॅप, मल्टी सेक्टर आणि विकासाभिमुख (ग्रोथ ओरिएंटेड) आहे.
- या योजनेचे गुंतवणूक तत्त्व InQuBeवर आधारित आहे.
- या नवीन फंड ऑफरमध्ये किमान 500 रुपयांची गुंतवणूक करता येईल. त्यानंतर कोणतीही रक्कम 1 रुपयाच्या पटीत गुंतविली जाऊ शकणार आहे.
कशाप्रकारचा फंड?
ही स्कीम हाय अॅक्टिव्ह शेअर कंपोनंट क्षमतेसह आपल्या श्रेणीतला अशाप्रकारचा फंड असणार आहे, जो गुंतवणूकदारांना त्यांची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करेल. करेल.गुंतवणुकीसाठी हे अशा उद्योगांना ओळखेल ज्यात फ्युचर्स नफा दाखवत असतील आणि त्याचं उलाढाल प्रमाण तुलनेनं कमी असेल. योजनेचं व्यवस्थापन निमेश चंदन, मुख्य गुंतवणूक अधिकारी, सौरभ गुप्ता (इक्विटी भाग) आणि सिद्धार्थ चौधरी (कर्ज भाग) निधी व्यवस्थापन करत आहेत. निधीला एसअॅण्डपी बीएसई 500 टीआरआयविरुद्ध (S&P BSE 500 TRI) बेंचमार्क केलं जाईल.
गुंतवणूकदारांना संधी
भारत ही एक झपाट्यानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. ती लवचिकता दर्शवते आणि जगातली सर्वाधिक पसंतीच्या गुंतवणूक बाजारपेठांपैकी एक आहे. ज्या गुंतवणूकदारांना अर्थव्यवस्थेच्या वाढीचा आणि या वाढीला हातभार लावणाऱ्या विविध क्षेत्रांचा फायदा घ्यायचा आहे, अशा गुंतवणूकदारांना एक चांगली संधी मिळते. हा फ्लेक्सी कॅप फंड मेगाट्रेन्ड्स धोरणाद्वारे चालवला जातो, याचा अर्थ फंड मॅनेजर योग्यवेळी ट्रेंडमध्ये येण्याच्या आणि योग्यवेळी त्यातून बाहेर पडण्याच्या उद्देशानंच गुंतवणूक करेल.
फायदा किती?
हा फंड गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्मॉल-कॅपपासून लार्ज-कॅपपर्यंतच्या मार्केट कॅपमधल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा देतो. हा फंड दीर्घकालीन गुंतवणुकीचं उद्दिष्ट असलेल्यांसाठी फायद्याचा आहे.