पेट्रोल-डिझेलचे दर सध्या स्थिर आहेत तर सध्या घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅसच्या दरात मे महिन्यात 2 वेळा दरवाढ करण्यात आली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे तेल आणि गॅस उद्योगावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीमुळे भारतात कंपन्यांनी घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. घरगुती वापराच्या 14.2 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 3 रुपये 50 पैशांनी वाढली आहे. तर व्यावसायिक एलपीजीच्या दरात 8 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
LPG गॅसचा आजचा भाव
आजपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 3 रुपये 50 पैशाने वाढल्यामुळे मुंबईमध्ये एका सिलेंडरसाठी1003 रुपये मोजावे लागणार आहेत. तर व्यावसायिक एलपीजी सिलिंडर देखील 8 रुपयांनी महाग झाल्याने 19 किलो वजनाचा सिलिंडर मुंबईत 2306 रुपये झाली आहे. याच महिन्यातील हि दुसरी दरवाढ आहे.
7 मे रोजी 50 रुपयांनी महाग झाला होता.
7 मे रोजी घरगुती LPG गॅसच्या किमतीत 50 रूपयांनी वाढ केल्याने एका सिलेंडरची किंमत 999.50 रूपये झाली आहे. व्यावसायिक वापराच्या 19 किलो गॅस सिलेंडरच्या किमतीत 1 मे रोजी 102.50 रुपयांची वाढ 2307 केली होती. पण 7 मे रोजी सरकारने 10 रुपयांनी स्वस्त केला होता त्यावेळी गॅसची किंमत 2297.50 झाली होती. पण आज केलेल्या 8 रुपयांच्या दरवाढीने मुंबईत सिलेंडरची किंमत 2306 रूपये झाली आहे.
घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याचा फटका खाद्यपदार्थांच्या किमतीवरही होऊ शकतो. सततच्या होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या गॅस सिलेंडरच्या दरवाढीने गृहिणींना आपले बजेट वाढवावे लागणार आहे.
image source - https://bbc.in/3Mtreel