Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Annapurna Finance Bank License : ओडिशातल्या अन्नपूर्णा फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा बँकिंग परवान्यासाठी अर्ज

Banking License

Annapurna Finance Bank License : ओडिशातल्या अन्नपूर्णा फायनान्स कंपनीने रिझर्व्ह बँकेकडे बँकेच्या परवान्यासाठी अर्ज केला आहे. बँकेचा परवाना मिळाला तर महिला उद्योजकांना अर्थसहाय्य करणाऱ्या कंपनीला तसा परवाना मिळणारी ती पहिली संस्था ठरेल.

अन्नपूर्णा फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड (Annapurna Finance Private Limited) या वित्तविषयक संस्थेनं रिझर्व्ह बँकेकडे (Reserve Bank of India) बँकिंग परवान्यासाठी अर्ज केला आहे. डिसेंबर तिमाहीत तसा अर्ज आपल्याकडे आल्याचं रिझर्व्ह बँकेनंही नमूद केलं आहे. जून 2022 पासून डिसेंबर 2022 पर्यंत युनिव्हर्सल बँकिंग परवान्यासाठी (Universal Banking License) आलेले 7 अर्ज फेटाळल्याची माहितीही रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.     

अन्नपूर्णा फायनान्स ही ओडिशा (Odisha) राज्यातली वित्तीय संस्था आहे. आणि महिला उद्योजकांना रोजगार मिळवून देण्यात ही संस्था आघाडीवर आहे. 1990मध्ये पतपेढीच्या स्वरुपात तिची स्थापना झाली होती. आणि तिथून मायक्रोफायनान्स कंपनी म्हणून तिचा विस्तार झाला.    

अन्नपूर्णा फायनान्स कंपनी काय आहे?    

केअर रेटिंगने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशाच्या खुर्दा जिल्ह्यात कंपनीने आपलं काम सुरू केलं. आणि महिला बचत गटांना सक्षम करण्याच्या हेतूने तिची स्थापना करण्यात आली होती. पण, हळू हळू तिचा विस्तार इतर राज्यांमध्येही झाला. आणि 2009 मध्ये अन्नपूर्णा फायनान्सने वाराणसीमधली ग्वाल्हेर लिजिंग कंपनी ताब्यात घेतली. इथून अन्नपूर्णा कंपनी बँकेतर वित्तीय संस्था बनली.     

ही कंपनी महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्याबरोबरच वैयक्तिक कर्जं, गृहकर्ज आणि लघु तसंच मध्यम उद्योगांसाठीही कर्जं देते. 2022 मध्ये कंपनीने आपला वार्षिक ताळेबंद प्रसिद्ध केला होता. त्यानुसार, 20 राज्यांमध्ये वित्त संस्थेच्या 984 शाखा आहेत. आणि कंपनीचे 23 लाख ग्राहक आहेत. आतापर्यंत कंपनीने 6,553 कोटी रुपयांची कर्जं दिली आहेत.    

आता रिझर्व्ह बँक आपले निकष तपासून अन्नपूर्णा फायनान्सला बँकिंग लायसन्स द्यायचा की नाही, ते ठरवेल. पण, तो या संस्थेला मिळाला तर महिला उद्योजकांना अर्थसहाय्य व्हावं म्हणून तयार झालेल्या एका संस्थेला मिळालेला तो बँकिंग परवाना असेल.