Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Walmart Layoffs: अमेरिकन रिटेल कंपनी ‘वॉलमार्ट’ची नोकरकपातीची घोषणा!

Walmart Layoffs

Walmart Layoffs: जगभरात नोकरकपात होत असताना त्याचे पडसाद आता ‘Walmart’ या अमेरिकन रिटेल कंपनीमध्येही उमटताना पाहायला मिळत आहेत. लवकरच कंपनी अमेरिकेतील 5 वेगवेगळ्या ई-कॉमर्स वेअरहाऊसमधून 2000 हून अधिक कर्मचाऱ्यांची नोकरकपात करणार आहे.

सध्या संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचे सावट पाहायला मिळत आहे. त्यामुळेच अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी नोकरकपात करायला सुरुवात केली आहे. अमेरिकन रिटेल कंपनी वॉलमार्ट (Walmart) 2000 हून अधिक कर्मचाऱ्यांची नोकरकपात करणार आहे. ही नोकरकपात अमेरिकेतील 5 वेगवेगळ्या ई-कॉमर्स वेअरहाऊसमधून (E-Commerce Warehouse) केली जाणार आहे. नोकरकपाती संदर्भातील संकेत कंपनीने एका महिन्यापूर्वीच दिले होते.

कर्मचाऱ्यांना इतर विभागात पाठवणार  

अमेरिकन रिटेल कंपनी वॉलमार्ट (Walmart) इंक लवकरच अमेरिकेतील 5 वेगवेगळ्या ई-कॉमर्स वेअरहाउसमधील 2000 हून जास्त कर्मचाऱ्यांची नोकरकपात करणार आहे. यासंदर्भातील संकेत कंपनीने एका महिन्यापूर्वीच दिले होते. कंपनीच्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये यासंदर्भात खुलासा करण्यात आला होता. मात्र ही नोकरकपात करत असताना कंपनीने कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या इतर विभागामध्ये काम करण्याची संधी देणार आहे. जास्तीत जास्त ऑनलाईन ऑर्डर मिळवण्यासाठी कंपनी स्वतःचा विस्तार करत आहे. त्यामुळे नोकरकपात केलेल्या काही कर्मचाऱ्यांना कंपनी इतर विभागांमध्ये सामावून घेणार आहे.

‘या’ ठिकाणी केली जाईल कर्मचारी कपात

रिटेल कंपनी वॉलमार्ट कुठे नोकरकपात करेल याची माहिती देणारा रिपोर्ट ब्लूमबर्गने (Bloomberg Report) जाहीर केला आहे. या रिपोर्टमधील माहितीनुसार फोर्ट वर्थ, टेक्सास, फ्लोरिडा, पेन्सिलवेनिया आणि न्यू जर्सी या ठिकाणच्या वेअरहाऊसचा समावेश आहे. फोर्ट वर्थ आणि टेक्सास या दोन्ही वेअरहाऊसमधून जवळपास 1000 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. फ्लोरिडा येथून 400 कर्मचारी आणि न्यू जर्सी येथून 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात येणार आहे. तसेच पेन्सिलवेनिया वेअरहाऊसमधून अंदाजे 600 कर्मचाऱ्यांना आपला जॉब गमवावा लागणार आहे. वॉलमार्ट या कपातीनंतर कॅलिफोर्नियामध्येही कर्मचारी कपात करेल, असे बोलले जात आहे. याशिवाय कंपनीकडून कर्मचाऱ्यांना 90 दिवसाच्या आत नवीन नोकरी शोधण्याचे सांगण्यात आले.  

आर्थिक मंदीचे सावट

सध्या संपूर्ण जगभरात आर्थिक मंदीचे सावट पसरले आहे. अशा परिस्थितीत उद्योगांना वाचवण्यासाठी आणि व्यवसाय सांभाळण्यासाठी नोकरकपात केली जात आहे. जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. यामुळे कर्मचारी वर्ग होरपळून जात आहे. 

Source: https://bit.ly/3zt0beo