Warrant against Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल हिच्या अडचणीत वाढ झालीए. अजय कुमार सिंह या व्यक्तिने अमिषा पटेल आणि तिचा बिझनेस पार्टनर कृणाल यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आता रांची सिव्हील कोर्टाकडून अमिषा पटेल व तिच्या पार्टनर विरोधात वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
काय आहे फसवणुकीचं प्रकरण
अमिषा पटेल आणि तिचा बिझनेस पार्टनर कृणाल यांनी झारखंडच्या एका चित्रपट निर्मात्याची फसवणूक केली आहे. अजय कुमार सिंह असे या चित्रपट निर्मात्याचे नाव आहे. देसी मॅजीक हा सिनेमा तयार करण्यासाठी अमिषा पटेल आणि तिचा बिझनेस पार्टनर कृणाल यांनी या निर्मात्याकडून अडीच कोटी रूपये घेतले होते. 2013 पूर्वी हा बँके ट्रान्सफरच्या माध्यमातून हा व्यवहार झाला होता. 2013 साली या सिनेमाचं शुटींग सुरू होणार होतं. मात्र, आजतागायत हा सिनेमा तयारच झाला नाही. कालांतराने अजय कुमार सिंह आपले पैसे व्याजासकट परत करावेत यासाठी अमिषा पटेल व कृणालकडे तगादा लावला.
त्यानंतर अमिशा पटेल यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये अजय कुमार सिंह यांना अडीच कोटीचे आणि 50 लाख रूपयांचे दोन चेक दिलेले. मात्र हे दोन्ही चेक बाऊंन्स झाले. तेव्हा अजय कुमार सिंह यांनी तक्रार दाखल केली.
अमिषा पटेल विरोधात कोणते गुन्हे दाखल
अमिषा पटेल विरोधात सीआरपीसी अंतर्गत सेक्शन 420 आणि 120 नुसार फसवणूक व चेक बाऊंन्सचे चार्जेस लावण्यात आले आहेत. यासंदर्भात रांची कोर्टाकडून वारंवार अमिषा पटेल विरोधात समन्स बजावण्यात आले. मात्र ती एकदाही कोर्टात हजर झाली नाही. वा तिचे वकिलही बाजु मांडण्यासाठी कोर्टात आले नाही. म्हणून अखेर रांची कोर्टाने हे वॉरंट जारी केले आहे. या संदर्भात पुढील सुनावणी ही 15 एप्रिल रोजी होणार आहे.