एअरटेलने 500 हून अधिक शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. पण अद्याप एअरटेलने 5G रिचार्ज साठी स्वंतंत्र प्लॅन लाँच केलेला नाही. तुम्हाला Airtel 5G सेवेचा लाभ घ्यायचा असेल, तर किमान 239 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. कंपनीने हे स्पष्ट केले आहे की 239 रुपयांपेक्षा कमी मासिक रिचार्ज प्लॅनमध्ये 5G सेवा वापरता येणार नाही.
Airtel अनलिमिटेड 5G
Airtel ने घोषणा केली आहे की जोपर्यंत कंपनी 5G रिचार्ज प्लान लाँच करत नाही तोपर्यंत ग्राहक अनलिमिटेड 5G सेवा मोफत वापरू शकतील. पण, एअरटेलच्या 5G सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तीन अटी पूर्ण कराव्या लागतील. कोणत्या ते जाणून घेऊया.
- पहिली अट - मोफत 5G इंटरनेट वापरण्यासाठी, तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असणे आवश्यक आहे आणि तुमच्या फोनमध्ये मिड-बँड 5G नेटवर्क सपोर्ट उपलब्ध असणे आवश्यक आहे.
- दुसरी अट - तुम्ही राहत असलेल्या परिसरात 5G सेवा उपलब्ध असावी. एअरटेलने 500 हून अधिक भारतीय शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे.
- तिसरी अट - फोनमध्ये किमान 239 रुपयांचा रिचार्ज असावा.
Jio ने भारतातील 500 शहरांमध्ये प्रथम 5G नेटवर्क आणले आहे. जिओ स्टँडअलोन 5G नेटवर्कवर काम करते. तर एअरटेल नॉन स्टँडअलोन नेटवर्कवर काम करते.
239 रुपयांवरील प्लॅनवर OTT सबस्क्रिप्शन उपलब्ध
एअरटेलने अलीकडेच आपल्या सर्व प्रीपेड आणि पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अमर्यादित 5G डेटा ऑफर लॉन्च केली आहे. Airtel 5G Plus नेटवर्क क्षेत्रात राहणारे Airtel वापरकर्ते त्यांच्या 5G स्मार्टफोनवर मोफत अमर्यादित व हायस्पीड 5G डेटाचा आनंद घेऊ शकतात. ही ऑफर प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाइल कनेक्शन असलेल्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध आहे ज्यांचा सक्रिय डेटा प्लॅन 239 रुपये आणि त्याहून अधिक आहे.
अमर्यादित 5G व्यतिरिक्त, Airtel प्रीपेड प्लॅन्सवर Disney Hotstar चे मोफत OTT सबस्क्रिप्शन देखील ऑफर करणार आहे. आगामी IPL 2023 सीझनसाठी प्रेक्षक क्रिकेट सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. 5G नेटवर्कसह प्रेक्षक विनामूल्य हे सामने बघू शकतात.
www.zeebiz.com