टेलिकॉम क्षेत्रात सध्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोनच कंपन्यांमध्ये 5G नेटवर्क विस्तारासाठी स्पर्धा लागली आहे. भारती एअरटेलने देशातील तब्बल 3000 शहरांमध्ये 5G सेवा सुरु केली. कंपनीने सप्टेंबर 2022 पासून एअरटेलने भारतात 5G सेवेचा विस्तार सुरु केला होता. हा वेग इतका जबरदस्त होता की दररोज 30 ते 40 शहरांमध्ये 5G सुरु केल्याचा दावा दावा एअरटेलने केला आहे.
एअरटेलकडून प्रीपेड आणि पोस्टपेडच्या निवडक प्लॅन्समध्ये 5G सेवा ऑफर करत आहे. याशिवाय कंपनीने 5G एक्स्पिरिअन्स झोन्स देखील काही निवडक रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध केले आहेत. 5G सेवा कमर्शिअल वापरासाठी उपलब्ध करणारी एअरटेल ही भारतातील पहिली कंपनी ठरली आहे. याचा अर्थ एअरटेलचा युजर 5G नेटवर्कमध्ये असल्यास तो 5G कनेक्टिव्हीटी वापरु शकतो. रिलायन्स जिओ मात्र केवळ 5G सेवा आमंत्रणानुसार उपलब्ध करत आहे.
जम्मूमधील कटरापासून केरळपर्यंत एअरटेलचे 5G उपलब्ध झाले आहे. त्याशिवाय बिहारमधील पटनापासून तामिळनाडूमधील कन्याकुमारी या शहरातील युजर्स एअरटेलची 5G सेवा वापरत आहेत. ईशान्य भारतातल्या अरुणाचलप्रदेशमधल्या इटानगर आणि दमण आणि दिव सारख्या केंद्रशासित प्रदेशात देखील एअरटेलने 5G सेवा सुरु केली आहे. डिसेंबर 2023 अखेर भारतातील सर्वच शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्याचा एअरटेलचा प्रयत्न आहे.
भारतात एका मोठ्या भागात 5G सेवा सुरु केली आहे. येत्या सप्टेंबर 2023 अखेर महत्वाची शहरे आणि ग्रामीण भाग 5G सेवे जोडली जातील असा विश्वास भारती एअरटेलचे सीटीओ रणदीप सेखोन यांनी व्यक्त केला. सध्या दररोज 30 ते 40 शहरांमध्ये एअरटेलकडून 5G सेवा सुरु करण्यात येत असल्याचे सेखोन यांनी सांगितले. 5G सेवेला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.