Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Airport Lounge Facility: एअरपोर्टवर खरंच फक्त 2 रुपयात जेवण करता येते?

Airport Lounge Facility

Airport Lounge Facility: तुमचे डेबिट कार्ड(Debit card) वापरून तुम्हीही एअरपोर्ट लाउंजमध्ये(Airport Lounge) भरपेट जेवण करू शकता आणि तेही फक्त २ रुपयांमध्ये.

Airport Lounge Facility: हल्ली वेगवेगळ्या ऑफर्स(Offers) आणि डिस्काउंटमुळे(Discount) विमानप्रवास करणे अधिक सोपे झाले आहे. त्यामुळेच तर विमानप्रवास करणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रवास करताना लागणारा प्रदीर्घ वेळ टाळण्यासाठी सुद्धा बरेच जण विमानप्रवासाला प्राधान्य देतात. पण आजही एअरपोर्टवर मिळणाऱ्या बऱ्याच सेवा या अधिक खर्चिक आणि अतिशय महाग असतात. विमानाचे तिकीट बुक करतानाच आपल्याला जेवणासंदर्भात विचारले जाते. बऱ्याच वेळा लांबचा प्रवास करताना आपल्याला दुसऱ्या एअरपोर्टवर फ्लाईटसाठी प्रतीक्षा करावी लागते. या मधील वेळात आपल्याला जर भूक लागली तर एअरपोर्टवर आपल्याला अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स पाहायला मिळतात.पण त्याठिकाणच्या खाद्यपदार्थांच्या किंमती या अतिशय महाग असतात म्हणून आपण बऱ्याच वेळा हा खर्च टाळतो. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही एअरपोर्ट लाउंजमधून फक्त 2 रुपये खर्च करून अनलिमिटेड भरपेट जेवण किंवा नाश्ता(Unlimited Food or breakfast) करू शकता. कसे? चला तर जाणून घेऊयात.

'Airport Lounge' म्हणजे नक्की काय?

विशिष्ट विमानतळावर विश्रामगृह म्हणजेच 'Airport Lounge' तयार करण्यात आलेली असतात. जिथे तुम्हाला विश्रांती, जेवण इत्यादी प्रकारच्या सुविधा मिळतात. आपण ज्या एअरपोर्टवर आहोत त्या ठिकाणी या सुविधा आहे की नाहीत हे तपासणे अतिशय गरजेचे आहे. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रवासाचे तिकीट दाखवून कमी किंमतीत या सेवांचा लाभ घेता येतो.

'Airport Lounge' मध्ये 2 रुपयात जेवण कसे मिळते?

बँकेकडून तुम्हाला मिळालेल्या डेबिट(Debit) किंवा क्रेडिटचा(Credit card) वापर करून तुम्हीही एअरपोर्ट लाउंजमध्ये भरपेट जेवण किंवा नाश्ता करू शकता. प्रत्येक बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिटवर ही सेवा देण्यात आलेली असते. यासंदर्भातील अधिक तपशील तुम्ही ऑनलाईन(Online) रित्या किंवा थेट बँकेशी बोलून जाणून घेऊ शकता. तुम्ही किती वेळा एअरपोर्ट लाउंजमध्ये ही सुविधा घेऊ शकता हे प्रत्येक बँकेवर निर्धारित असते. हे कार्ड वापरत असताना लाउंज ऑपरेटरला व्यापारी शुल्क म्हणून कार्ड व्यवहारावर 2 रुपये शुल्क द्यावे लागते. जेव्हा कार्ड स्वाईप(Card swipe) केले जाते, तेव्हा पेमेंट नेटवर्कला कळते की हे एअरपोर्ट लाउंजमधून आले आहे. अधिकृततेकडून पुष्टी करण्यात येते की वैयक्तिक कार्ड वैध(Personal Card Valid) आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही सुविधा देण्यात येते. या कार्डसोबत तुम्हाला तुमच्या विमानाची तिकिटे(Flight Tickets) देखील दाखवावी लागतात. जर कार्ड्स स्वीकारली गेली नाहीत तर जेवणासाठी प्रत्येक व्यक्तीला 2000 रुपये मोजावे लागतील.

'Airport Lounge'मध्ये तुम्हाला कोणत्या सुविधा मिळतात?

एअरपोर्ट लाउंजमध्ये तुम्हाला मोफत प्रवेश करता येतो. जिथे तुम्हाला अनलिमिटेड  जेवण(Unlimited Food) आणि वेगवेगळी पेय(Drinks) दिली जातात
काही लाउंजमध्ये आरामशीर बसण्याची(Seating arrangement)सोय असते जिथे आपण बसून विश्रांती घेऊ शकतो
काही लाउंजमध्ये स्वतंत्र खोल्या असतात जिथे प्रवासी झोपू(Sleeping arrangement) देखील शकतात
तुम्ही तुमच्या पुढील फ्लाइटच्या आधी आंघोळ(Bath) देखील करू शकता
तुम्ही लाउंजच्या आवारातील वॉशरूम(Washroom) वापरू शकता
लाउंजमध्येच आराम करून तुमच्या पुढील फ्लाइट तपशीलांचे निरीक्षण करण्याची सुविधाही तुम्हाला मिळते 
काही लाउंज अटेंडंट तुम्हाला तुमच्या पुढील फ्लाइट बोर्डिंग वेळेबद्दल देखील सूचित करतात

कोणत्या बँकेचे  कार्ड स्वीकारले जातील?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया(डेबिट कार्ड)
प्रवेश मर्यादा- 2/चतुर्थांश

एसबीआय प्लॅटिनम(डेबिट कार्ड)
प्रवेश मर्यादा- 2/चतुर्थांश

आयसीआयसीआय बँक कोरल पेवेव्ह(डेबिट कार्ड)
प्रवेश मर्यादा- 2/चतुर्थांश

आयसीआयसीआय बँक रुबीक्स(डेबिट कार्ड)
प्रवेश मर्यादा- 2/चतुर्थांश

आयसीआयसीआय बँक सॅफिरो(डेबिट कार्ड)
प्रवेश मर्यादा- 4/चतुर्थांश

एचडीएफसी रूपे प्रीमियम इंटरनॅशनल(डेबिट कार्ड)
प्रवेश मर्यादा- 2/चतुर्थांश

एचडीएफसी बँक मिलेनिया(डेबिट कार्ड)
प्रवेश मर्यादा- 4/वर्ष

अॅक्सिस बँक रुपे प्लॅटिनम(डेबिट कार्ड)
प्रवेश मर्यादा- 2/चतुर्थांश

अॅक्सिस बँक डिलाईट(डेबिट कार्ड)
प्रवेश मर्यादा- 2/चतुर्थांश

बँक ऑफ इंडिया रुपे प्लॅटिनम(डेबिट कार्ड)
प्रवेश मर्यादा- 2/चतुर्थांश

आयडीबीआय रुपे प्लॅटिनम(डेबिट कार्ड)
प्रवेश मर्यादा- 2/चतुर्थांश

'Airport Lounge' सुविधा असलेल्या विमानतळांची यादी

मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली, गोवा, विजयवाडा, विशाखापट्टणम, चंडीगड, अहमदाबाद, वडोदरा, बेंगळुरू, कालिकत, कोचीन, तिरवेंद्रम,  भुवनेश्वर, उदयपूर, चेन्नई, कोईम्बतूर, हैद्राबाद, कद्दोल्कादौम या देशातील  एअरपोर्टवर या सुविधा उपलब्ध आहेत.