Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Liquid Mutual Funds: लिक्विड फंड गुंतवणुकीतील फायदे आणि तोटे काय आहेत?

liquid mutual funds

तुम्ही कोठेही गुंतवणूक करत असाल तर फायदे-तोटे असतातच. तसेच जोखीमही असते. मात्र, तोटे आणि जोखीम कमी असलेल्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करायला हवी. या लेखात आपण पाहू लिक्विड म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचे फायदे-तोटे काय आहेत.

गुंतवणूक करताना जोखीम घेण्याची क्षमता कमी असणाऱ्यांसाठी लिक्विड म्युच्युअल फंड चांगला पर्याय आहे. जर तुमच्याकडे अतिरिक्त पैसे असतील, आणि ते तुम्हाला थोड्या कालावधीसाठी गुंतवायचे असतील तर लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता. या फंडामध्ये केलेली गुंतवणूक तुम्ही कधीही काढू शकता. मुदत ठेवींपेक्षा लिक्विड फंडातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, मुदत ठेवींच्या तुलनेत जोखीम थोडी जास्त असते. या लेखात पाहूया लिक्विड फंड गुंतवणुकीतील फायदे-तोटे काय आहेत.

लिक्विड फंड गुंतवणुकीतील फायदे काय?

अल्प कालावधीत चांगला परतावा

लिक्विड म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून अल्प काळात चांगला परतावा मिळू शकतो. (best liquid mutual funds for investment) जो मुदत ठेवींमधील गुंतवणुकीत कमी मिळतो. तसेच फक्त बचत खात्यात पैसे ठेवण्यापेक्षा लिक्विड फंडमध्ये गुंतवणे योग्य राहील. मागील काही वर्षात बचत खात्यावरील व्याजदर जास्त वाढले नाहीत. लिक्विड फंडातून 7 ते 7.5% व्याजदर मिळू शकतो. प्रत्येक योजनेनुसार परतावा कमी-जास्त होऊ शकतो.

कमी जोखीम

लिक्विड फंडमध्ये तुलनेने कमी जोखीम असते. लिक्विड फंड्स कमी मुदतीचे सरकारी आणि खासगी रोख्यांमध्ये गुंतवणूक करते. (how to manage risk in liquid mutual funds) त्यामुळे जर तुम्ही अल्प कालावधीत गुंतणुकीचा पर्याय शोधत असाल तर लिक्विड फंड हा पर्याय चांगला आहे. कारण, शेअर मार्केट अचानक खाली आले तर पैसे काढता येत नाही. कारण मूळ गुंतवणुकीचे मूल्य कमी झालेले असते.

सर्वसामान्यांना गुंतवणुकीची संधी

लिक्विड फंड्स चा समावेश फिक्स इनकम मार्केट मध्ये होते. यामध्ये सुरुवातीला फक्त बँक, विमा कंपन्या आणि पेन्शन फंड इ. गुंतवणूक करत असत. मात्र, आता सर्वसामान्य नागरिकांनाही लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक करता येते.

हाय लिक्विडिटी

हाय लिक्विडिटी म्हणजेच गुंतवणुकदाराला त्याचे पैसे किती वेळात माघारी मिळतात. तर लिक्विड फंडमध्ये केलेली गुंतवणूक एकाच दिवसात माघारी मिळू शकते. त्यामानाने इतर पर्यायांत गुंतवणूक केल्यास जास्त वेळ लागू शकतो. आणीबाणीच्या काळात तुम्हाला लवकर पैसे हवे असतील तर तुम्ही ते काढू शकता. तसे शेअर मार्केटमध्ये करता येत नाही. बऱ्याच वेळा मार्केट खाली आलेले असेल तर शेअर्स विकून तोटा होतो.

व्याजदराची जोखीम कमी

लिक्विड फंडमधील गुंतवणुकीवर जे व्याज मिळते त्यात सतत बदल होत नाही. ते सहसा स्थिर राहतात. मात्र, इक्विटी मार्केटमध्ये बाजार अस्थिर असल्याने व्याजदर कायम बदलत असतात. त्यामानाने लिक्विड फंडमध्ये व्याजदर स्थिर असतो. हे फंड 91 दिवसांत परिपक्व होत असल्याने त्यात जास्त चढउतार होत नाही.

ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम योजना

ज्येष्ठ नागरिकांसाठी लिक्विड फंडमधील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. कारण, त्यांची जोखीम पत्करण्याची क्षमता कमी असते. तसेच मुदत ठेवींपेक्षा लिक्विड फंडमध्ये जास्त व्याजदर मिळण्याची शक्यता असते. तसेच पाहिजे तेव्हा पैसेही काढू शकतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी मुदत ठेवींपेक्षा लिक्विड फंडमधील गुंतवणुकीला प्राधान्य दिलेले योग्य राहील.

लिक्विड फंडातील गुंतवणुकीचे तोटे

लिक्विड म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत जोखीम असते. (Risks Involved in Liquid Mutual Funds) जसे मुदत ठेवीमध्ये सुरक्षितता असते तशी सुरक्षितता लिक्विड फंडमध्ये नसते. कारण, हे फंड भांडवली बाजारात पैसे गुंतवतात. जर तुम्ही गुंतवणूक केलेला फंड AAA क्रेडिट रेटिंगचा नसेल तर धोका अधिक वाढतो. मुद्दल आणि व्याज दोन्हीही गमावण्याची वेळ येऊ शकते.

परताव्यावरील कर

लिक्विड म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीला तुमच्या टॅक्स स्लॅब नुसार शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो. जे गुंतवणुकदार वरच्या टॅक्स स्लॅबमध्ये येतात. त्यांना अल्प कालावधीत जास्त कर द्यावा लागू शकतो.

फंड शुल्क

मुदत ठेवींवर शुल्क आकरले जात नाही. कारण, तुमचे पैसे व्यवस्थापित करण्यासाठी फंड मॅनेजर नसतो. मात्र, लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर फंड चार्जेस द्यावे लागतात. इक्विटी मार्केटमधील गुंतवणुकीवर 2 ते 2.5% शुल्क असते. मात्र, इक्विटीफंडमध्ये 1 टक्क्यापेक्षा कमी असते. सहसा हे शुल्क कमी समजले जाते. लिक्विड फंडातील गुंतवणुकीचे फायदे तोटे पाहिल्यास लक्षात येते की, तोट्यांपेक्षा फायदे जास्त आहेत. अल्प कालावधीत जर तुमच्याकडे अतिरिक्त पैसे असतील तर तुम्ही तुम्ही लिक्विड फंडात गुंतवू शकता.