म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात.म्युच्युअल फंड उद्योगात जवळपास 39 प्रकारच्या वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांच्या योजना आहेत. त्यापैकी लिक्विड म्युच्युअल फंड श्रेणीची निवड केली असेल तर गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही काही महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.यात निवड करण्यापूर्वी लिक्विड म्युच्युअल फंड श्रेणीतील सर्वोत्तम योजना आणि नेट असेट व्हॅल्यू तसेच म्युच्युअल फंड कंपनीची एकूण कामगिरी, फंड मॅनेजरचा अनुभव आणि स्ट्रॅटेजी यांचाही विचार होणे आवश्यक आहे. (Factors to Consider before Investing in Liquid Funds)
Table of contents [Show]
फंडांची कामगिरी तपासणे
केवळ लिक्वीड म्युच्युअल फंडांपुरताच नाही तर हा नियम सर्वच श्रेणीतील म्युच्युअल फंडांना लागू होते. आपण ज्या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करणार आहोत त्या योजनेची आजवरची कामगिरी आहे हे नीट समजून घेणे आवश्यक आहे. संबधित योजनेचा बेंचमार्क आणि योजनेची मागील 3 ते 5 वर्षांतील कामगिरी आणि गुंतवणूकदारांना मिळालेला परतावा पाहिला तर निर्णय घेणे सोपे जाते. याशिवाय याच योजनेशी श्रेणीतील इतर योजनांसोबत तुलना केल्यास बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होते.
नेट असेट व्हॅल्यू
लिक्विड फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी त्या फंडांची नेट असेट व्हॅल्यू पाहणे आवश्यक आहे. बहुतांशवेळा नेट असेट व्हॅल्यू उच्च असल्यास गुंतवणूक महागडी ठरते. शिवाय अशा फंडांकडून परतावा देखील मर्यादित मिळतो. उच्चे एनएव्ही असलेल्या म्युच्युअल फंडांची वृद्धी संथगतीने होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र दुसरी जमेची बाजू म्हणजे उच्च एनएव्हीवाले म्युच्युअल फंड चांगल्या दर्जाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. लो एनएव्ही म्युच्युअल फंडांच्या तुलनेत असे म्युच्युअल फंड अधिक भरवशाचे असतात.
फंड कंपनीची हिस्ट्री
म्युच्युअल फंड कंपनीची हिस्ट्री तपासणे महत्वाचे आहे. आपण ज्या योजनेत पैसे गुंतवणूक करणार आहोत ती योजना हातळणारी म्युच्युअल फंड कंपनी (AMC) किती अनुभवी आहे. ही कंपनी किती वर्षांपासून म्युच्युअल फंड उद्योगात आहेत. त्यांच्याकडे किती संपत्तीचे व्यवस्थापन केले जाते याचाही आढावा गुंतवणूकदाराने घ्यायला हवा.
खर्चाचे प्रमाण (Expense Ratio)
म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरील शुल्क हे खर्चानुसार ठरते. फंड कंपन्या योजनेवर किती खर्च करतात त्यानुसार त्या फंडातील गुंतणुकीवर शुल्क लागू केले जाते. फंड योजनेवरील खर्च हा फंड मॅनेजर्ससाठी होणारा खर्च, योजनेचे प्रमोशन, वितरण यानुसार निश्चित केला जातो. सर्वसाधारणपणे बहुतांश म्युच्युअल फंड योजनांमध्ये एक्सपेन्स रेशो हा 1 ते 2% या दरम्यान असतो. काहीवेळा तो 1% किंवा त्याहून कमी असतो. मात्र म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना एक्सपेन्स रेशो आवर्जून पाहिला जातो.
एक्झिट लोड
अनेकदा गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात जोमाने गुंतवणूक सुरु करतात. एक वर्ष, दोन वर्ष गुंतवणूक सुरु राहते. मात्र उत्पन्न कमी झाल्यास फंडातील गुंतवणूक बंद करण्याचा विचार केला जातो. यातही कधी कधी मुदतपूर्व किंवा लॉक इन पिरिएडपूर्वीच पैसे काढून घेतले जातात. अशावेळी म्युच्युअल फंड कंपनी एक्झिट लोड आकारते. पैसे काढून घेताना किती शुल्क आकारले जाते हे समजून घेणे आवश्यक आहे.
फंड मॅनेजरचा अनुभव
म्युच्युअल फंड योजनेचे व्यवस्थापन करणारा फंड मॅनेजर हा महत्वाचा व्यक्ती आहे.बाजारातील अनेक फंड मॅनेजर्सनी आपल्या कौशल्याने फंड योजनांना नव्या उंचीवर नेले आहे. त्यामुळे फंड मॅनेजर्सचा अनुभव आणि त्याची गुंतवणूक स्ट्रॅटेजी एक महत्वाचा घटक आहे.