Aditya Birla Scholarship: आदित्य बिर्ला ग्रूपद्वारे दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार स्कॉलरशीपमुळे कमी होण्यास मदत होते. या स्कॉलरशीपद्वारे विद्यार्थ्यांना 3 लाख रुपये मिळू शकतात. देशातील टॉप कॉलेज आणि विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. IIT, IIM, लॉ कॉलेजसह इतर काही संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या गरजू विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो. 1999 पासून आदित्य बिर्ला ग्रूपद्वारे ही शिष्यवृत्ती दिली जाते.
किती रुपये स्कॉलरशीप मिळू शकते?
व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांना 3 लाख रुपये.
अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना 1.5 लाख रुपये.
विधी शाखेतील विद्यार्थ्यांना 1.80 लाख रुपये.
कोणत्या कॉलेज विद्यापीठातील विद्यार्थी अर्ज करू शकतात?
IIM - अहमदाबाद, बंगळुरू, कोलकाता, लखनऊ, कोझिकोड, शिलाँग
सेंट झेवियर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
IIT - मुंबई, दिल्ली, चेन्नई, कानपूर, खरगपूर, रुरकी, गुवाहटी
विधी महाविद्यायले - नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया, बंगळुरू, नलसार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ
The WB National University of Juridical Sciences, गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी.
या संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल.
अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?
शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरून संबधित कॉलेजमध्ये अर्ज जमा करावेत. कॉलेजद्वारे हे अर्ज बिर्ला ग्रूपकडे पाठवण्यात येतील.
निवड प्रक्रिया कशी असेल?
व्यवस्थापन शाखेतील 100, अभियांत्रिकी शाखेतील 160 आणि इंजिनिअरिंग शाखेतील 100 विद्यार्थ्यांचे अर्ज निवडून तपासले जातील. यामध्ये विद्यार्थ्याने मिळवलेले यश, अवांतर विषयातील आवड पाहून पुढील टप्प्यासाठी अर्ज निवडण्यात येईल.
दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांकडून निबंध लिहून घेतले जातील. यामध्ये विद्यार्थ्याने मांडलेली मते, विचार तपासली जातील. यामध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या टप्प्यासाठी बोलवले जाईल.
शेवटच्या टप्प्यात विद्यार्थ्याची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीसाठी जाताना विद्यार्थ्याला शैक्षणिक निकाल आणि इतर कागदपत्रे घेऊन जावे लागेल.
एकदा निवड झाल्यास पुढील वर्षी शिष्यवृत्ती दिली जाते का?
विद्यार्थ्याची एकदा निवड झाल्यास त्याला दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाऊ शकते. मात्र, वर्षभरातील विद्यार्थ्याचे मूल्यमापन केले जाते. जर विद्यार्थ्याची कामगिरी समाधानकारक वाटली नाही तर पुढील वर्षी शिष्यवृत्ती मिळत नाही. तसेच ज्या विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली आहे त्यांना पुढील वर्षी स्कॉलरशीप सुरू ठेवली जाते.