गेल्या अनेक दिवसांपासून एकाच चित्रपटाची चर्चा पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. भारतातील प्रसिद्ध पौराणिक महाकाव्य रामायणावर आधारित 'आदिपुरुष'(Adipurush) चित्रपट 16 जून 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित आदिपुरूष चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas), क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
हा चित्रपट प्रदर्शित व्हायला उद्याचाच दिवस बाकी आहे. तुम्हाला देखील या चित्रपटाचा फस्ट डे फस्ट शो (First Day First Show) पाहायचा असेल, तर त्याचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. लगेचच विकेंड असल्याने चित्रपटाचे बुकिंग पटापट होत आहे. अशा परिस्थितीत सिनेमगृहाच्या खिडकीवर जाऊन तिकीट बुक करण्याऐवजी तुम्ही घरबसल्या Bookmyshow किंवा Paytm वरून एका क्लिकवर तिकिटे बुक करू शकता.
ॲडव्हान्स तिकीटे बुक करण्याची प्रक्रिया जाणून घ्या
आदिपुरुष (Adipurush) चित्रपटाच्या तिकिटाचे बुकिंग करण्यासाठी Bookmyshow ॲपवर गेल्यावर 'Movie' सेक्शनमध्ये तुम्हाला आदिपुरुष चित्रपटाचे पोस्टर पाहायला मिळेल. या पोस्टरच्या खाली तुम्हाला 'Book My Ticket' हा पर्याय पाहायला मिळेल. या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला 'Select Language' फॉरमॅटमधील हिंदी किंवा तेलगू भाषा निवडावी लागेल. आणि 2D किंवा 3D पैकी एकाची निवड करावी लागेल. या पर्यायाची निवड केली की लगेच, तुम्हाला Bookmyshow, 16 तारखेच्या बुकिंग सेगमेंटवर घेऊन जाईल.
त्याठिकाणी तुम्हाला तुमच्या जवळच्या सिनेमागृहांची नावे पाहायला मिळतील. सोबत शोचे टाईम देखील पाहायला मिळेल. काही सिनेमागृहे तुम्हाला तिकीट कॅन्सल करण्याची सुविधा देतील, तर काही सिनेमागृहे हा पर्याय देत नाहीत. त्यामुळे बुकिंग करताना काळजीपूर्वक बुकिंग करा. चित्रपटाचे तिकीट हे सिनेमागृहानुसार बदलू शकते.
तुम्हाला हव्या असणाऱ्या शोच्या टाईमवर क्लिक करा. समोर आलेल्या नियम व अटी वाचून 'Accept' या पर्यायावर क्लिक करा.
तुम्हाला किती तिकिटे बुक करायची आहेत, ती संख्या निवडा. त्याठिकाणीच तुम्हाला तिकिटांच्या सिटिंग अरेंजमेंटनुसार वेगवेगळ्या किंमती पाहायला मिळतील. त्यानंतर 'Select Seats' पर्यायावर क्लिक करा.
आता तुम्हाला हवी असणारी सीट सिलेक्ट करा. सीट सिलेक्ट केली की खाली 'Pay' या पर्यायावर क्लिक करा. जर तुमच्याकडे Bookmyshow चा कोणताही डिस्काउंट असेल, तर त्याचा कोड Offer Code मध्ये टाका आणि डिस्काउंट मिळावा. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ऑनलाईन बँकिंग किंवा UPI च्या मदतीने तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यावर तुम्हाला मेल आणि whats app वर तिकीट उपलब्ध करून देण्यात येईल.
ॲडव्हान्स बुकिंगमधून केली 'इतकी' कमाई
Koimoi च्या माहितीनुसार, चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने 11 जूनच्या रात्री ब्लॉक केलेल्या सीट्स वगळता एकूण 1.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर 3D आवृत्तीने 1.35 कोटी रुपये कमावले आहेत. तसेच हिंदी व तेलगू चित्रपटातील गाण्यांचे राईट्स विकून आतापर्यंत 430 कोटीहून अधिक कमाई चित्रपटाने केली आहे.
Source: livemint.com