गेल्या अनेक दिवसांपासून एकाच चित्रपटाची चर्चा पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. तो म्हणजे 'आदिपुरुष'. ओम राऊत दिग्दर्शित आणि अजय अतुल यांनी संगीतबद्द केलेला आदिपुरुष 16 जूनपासून देशभरात प्रदर्शित करण्यात येणार आहे. भारतातील पौराणिक महाकाव्य असलेल्या रामायणावर या चित्रपटाचे कथानक रेखाटण्यात आले आहे. हा चित्रपट 2023 मधील बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas), क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ज्यासाठी त्यांनी तगडे मानधन देखील घेतले आहे. कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतले, जाणून घेऊयात.
Source: T-series
Table of contents [Show]
कलाकारांनी घेतलेले मानधन जाणून घ्या
प्रभास (Prabhas)
आदिपुरुष चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने 100 कोटींचे मानधन स्वीकारले आहे. सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये प्रभास पहिल्या क्रमांकावर आहे. यापूर्वी प्रभासने अनेक ऐतिहासिक सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. बाहुबली मधील त्याची महेंद्र बाहुबली ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली होती.
क्रिती सेनन (Kriti Sanon)
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननने या चित्रपटात जानकी उर्फ सीतेची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी क्रितीने 30 कोटी रुपयांचे मानधन घेतले असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी क्रितीने ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत. पानिपत या ऐतिहासिक चित्रपटात तिने भूमिका साकारली होती.
सैफ अली खान (Saif Ali Khan)
आदिपुरुष चित्रपटात सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचा टिजर लॉन्च झाल्यानंतर प्रेक्षकांनी यातील रावणाच्या भूमिकेवर टीका केली होती. मात्र त्यानंतर 9 मे रोजी आलेला ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक आता चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. रावणाची भूमिका साकारण्यासाठी सैफ अली खानने 12 कोटींचे मानधन स्वीकारल्याचे सांगितले जाते.
आदिपुरुष चित्रपटात लक्ष्मणाची भूमिका सनी सिंगने (Sunny Singh) साकारली आहे. तर हनुमानाच्या भूमिकेत मराठी अभिनेता देवदत्त नागे (Devdutt Nage) पाहायला मिळत आहे. या दोघांच्या मानधनाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
चित्रपटाचे एकूण बजेट किती?
आदिपुरुष हा 2023 मधील बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटाचे बजेट 500 कोटींचे आहे. त्यापैकी केवळ 100 कोटी रुपये हे प्रभासचे मानधन आहे. हा चित्रपट 16 जूनपासून संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे.
Source: english.jagran.com