भारतातील प्रसिद्ध पौराणिक महाकाव्य रामायणावर आधारित 'आदिपुरूष (Adipurush)' चित्रपट 16 जून 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित आदिपुरूष चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas), क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. रामायणावरील कथानकामुळे हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. असे असले तरीही या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच 423 कोटी रुपयांची कमाई केल्याची चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
चित्रपटाचे बजेट जाणून घ्या
2023मधील सर्वात मोठे बजेट असणारा चित्रपट म्हणजे 'आदिपुरूष'. 500 कोटींचे बजेट असणारा हा चित्रपट 16 जून रोजी शुक्रवारी देशभरात प्रदर्शित होत आहे. ओम राऊत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यासाठी अजय अतुल (Ajay-Atul) यांनी संगीत दिले आहे. विशेष म्हणजे हिंदी आणि तेलगू भाषेत हा चित्रपट एकाच वेळी शूट करण्यात आला आहे.
अशी केली कमाई?
सध्या या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर चांगलेच चर्चेत आहे. यावर लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट सध्या त्याच्या बिजनेसवरून चर्चेत आहे. याच कारण म्हणजे रिलीजपूर्वी या चित्रपटाने केलेली कमाई. अजूनपर्यंत या चित्रपटाचे प्री-बुकिंग सुरू झालेले नाही. तरीही या चित्रपटाने 423 कोटी रुपयांची कमाई नेमकी कशातून केली?
बॉलिवूड हंगामाच्या मीडिया रिपोर्टनुसार (Hungama Media Reports) आदिपुरूष चित्रपटाने रिलीजपूर्वी एकूण बजेटच्या 85 टक्के रकमेची कमाई केली आहे. ही 85 टक्के रक्कम 423 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ही कमाई चित्रपटाच्या नॉन थ्रिएटिकल रेव्हेन्यूमधून (Non-threatical revenue) जमा करण्यात आली आहे. आदिपुरुष हिंदी व्हर्जनचे म्युझिक राईट्स आणि डिजिटल राईट्स (Music rights and Digital rights) विकले गेले आहेत. त्या माध्यमातून 247 कोटी रुपयांची कमाई जमा झाली आहे.
हा चित्रपट तेलुगू भाषेत चित्रीत करण्यात आल्यामुळे दाक्षिणात्य नॉन थिएटरिकल रेव्हेन्यूमधून कमीत कमी 185 कोटी रुपयांची कमाई होईल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. हिंदी आणि तेलगु व्हर्जनमधील कमाई मिळून 423 कोटींहून जास्त रक्कम जमा आहे. बॉलिबुड हंगामाच्या माहितीनुसार आदिपुरूषचे ग्रँड ओपनिंग करण्यात येणार आहे. पहिल्या तीन दिवसात हिंदी व्हर्जनमधून 100 कोटींची कमाई होईल असे देखील बोलले जात आहे.
Source: dnaindia.com