Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Adani Enterprises FPO: FPO ची किंमत, कुठे कराल नोंदणी अशा महत्त्वाच्या 10 गोष्टी

Gautam Adani

Image Source : www.businesstoday.in

Adani Enterprises FPO: Hindenberg Report मुळे आधीच हा FPO गाजतो. आणि त्यातच आज तो बाजारात आला असताना शेअर बाजारात मोठी पडझड होतेय. अशावेळी FPO मध्ये गुंतवणूक करायची की नाही असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. आधी FPO विषयी माहिती जाणून घेऊया

Adani Enterprises FPO: अदानी एंटरप्रायजेसची फॉलो ऑन पब्लिक ऑफर (FPO) आजपासून प्राथमिक शेअर बाजारांमध्ये दाखल झाली आहे. आणि 31 जानेवारीपर्यंत तुम्ही यात बिडिंग करू शकता. या FPO च्या माध्यमातून अदानी समुहाला 20,000 कोटी रुपये उभे करायचे आहेत. या पैशातून कंपनीवर असलेलं कर्ज त्यांना फेडायचं आहे. तसंच अदानी समुहातल्या काही छोट्या कंपन्यांसाठी भांडवलही उभं करायचं आहे. या FPO चा किंमत 3,112 ते 3,276 इतकी ठेवण्यात आली आहे. तर सध्या शेअर बाजारात अदानी एंटरप्राईजेस च्या शेअरची किंमत साधारणपणे 3,405 रुपये इतकी आहे. याचाच अर्थ अदानी शेअर आपल्याला 5% सवलतीच्या दरात मिळणार आहे. खरंतर हाच FPO काढण्यामागचा उद्गेश असतो. नियमित गुंतवणुकदारांना सवलतीच्या दरात शेअर मिळावा आणि कंपनीलाही फायदा व्हावा. हिंडेनबर्ग अहवालामुळे या FPO भोवती वेगळाच वाद निर्माण झाला आहे. पण, सध्या आपण फक्त या FPO बद्गलच जाणून घेणार आहोत 10 मुद्यांमध्ये

  • FPO ची किंमत: अदानी एंटरप्रायजेसच्या FPO ची किंमत 3,112 ते 3,276 रुपयांच्या दरम्यान आहे. FPO साठी अर्ज करताना तुम्हाला या दरम्यानची एखादी किंमत कोट करावी लागेल. 
  • FPO ची मुदत: अदानी एंटरप्रायजेस ही अदानी समुहाची मुख्य किंवा फ्लॅगशिप कंपनी आहे. आणि या FPO साठी त्यांनी 31 जानेवारी 2023 ही शेवटची तारीख ठरवली आहे. 
  • FPO चा आकार: अदानी समुहाला या FPO मधून 20,000 कोटी रुपये जमा करायचे आहेत. त्यातून समुहावर असलेलं कर्ज फेडण्याचा तसंच समुहातल्या छोट्या कंपन्यांसाठी भांडवल उभं करण्याचा कंपनीचा मानस आहे. 
  • FPO मधले शेअर कधी जाहीर होणार: FPO मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांनी आपले अर्ज ऑनलाईन भरून दिले की, त्यांची छाननी करून साधारणपणे 3 फेब्रुवारीपर्यंत लोकांना किती शेअर मिळणार आहेत हे स्पष्ट होईल असा अंदाज आहे. यालाच शेअर अलॉटमेंट असं म्हणतात. 
  • FPO चा लॉट साईझ काय आहे: IPO प्रमाणेच इथंही ग्राहकांना लॉटमध्ये शेअरची नोंदणी करावी लागते. आणि या FPO साठी लॉट साईझ आहे 4. म्हणजे तुम्हाला 4 च्या पटीत शेअर खरेदी करावे लागतील. आणि किती लॉच घ्यायचे आहेत ते ही अर्जात नमूद करावं लागेल. 
adani-share-price-2.jpg
Source- Google 

अदानी समुहाच्या FPO बद्दल इतर माहिती जाणून घेण्यापूर्वी सध्या शेअर बाजारात हा शेअर कशी कामगिरी करतोय ते ही समजून घेऊया. कारण, FPO बाजारात आलेला आहे. आणि त्याच्या बरोबरीने हिंडेनबर्ग अहवालातल झालेल्या आरोपांमुळेही अदानी एंटरप्रायजेसच्या शेअरला फटका बसलाय. सकाळी अकरा वाजता हा शेअर 3,197 रुपयांवर होता. त्यात जवळ जवळ 6% घसरण दिसून आली. 

  • FPO चा रजिस्टार कोण आहे: शेअर बाजारात नियमित गुंतवणूक करणाऱ्या आणि FPO चा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी रजिस्ट्रार फर्म महत्त्वाची असते. त्यावरून FPO ची विश्वासार्हता ठरते. तर अदानी समुहाच्या FPO ची रजिस्ट्रार संस्था आहे लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड 
  • लिस्टिंग कुठे होणार: NSE आणि BSE असा दोन्ही शेअर बाजारांमध्ये या FPO चं लिस्टिंग होणार आहे 
  • लिस्टिंग बाजारात कधी होणार: शेअरची अलॉटमेंट आधी झालेली असेल. पण, प्रत्यक्ष लिस्टिंग 8 फेब्रुवारी 2023 ला होणार आहे. हे लिस्टिंग आयपीओ प्रमाणेच असतं. 
  • किरकोळ गुंतवणुकदारांसाठी काय आहे ऑफर: एकूण 20,000 कोटी शेअरसाठी हा FPO येणार आहे. यातले 35% शेअर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. किरकोळ म्हणजे व्यक्तिश: गुंतवणूक करणारे लोक. या खेरिज संस्थात्मक गुंतवणूक 
  • शेअर बाजार संशोधन संस्थांचा अहवाल काय सांगतो: शेअर बाजारातल्या गुंतवणुकीविषयी सल्ला देणाऱ्या संस्थांचंही या FPO वर लक्ष आहे. व्हेंच्युरा, निर्मल बंग या संस्थांनी FPO मध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. अदानी समुहाच्या शेअरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता त्यांनी भविष्यात वर्तवली आहे.