अदानी उद्योग समुहाच्या (Adani group of Industries ) अंबुजा सिमेंट या कंपनीने नुकताच एक व्यवहार केला आहे. अंबुजा सिमेंटने (Ambuja cement ) गुजरात मंधील सिमेंट व्यवसायातील सांघी इ़़डस्ट्रीजचे अधिग्रहण केले आहे. अदानी समुहाच्या या कंपनीने सांघी सिमेंट कंपनीची 56.76 टक्के भागभांडवल खरेदी केले आहे. हा व्यवहार तब्बल 5,000 कोटी रुपयांचा आहे.
2700 हेक्टरचे सिमेंट निर्मिती युनिट
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात सांघीपुरम सांघी इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचे सर्वात मोठे सिमेंट निर्मिती युनिट आहे. याचा एकूण विस्तार हा 2,700 हेक्टर इतका आहे. गुरुवारी अदानी सुमहाने सांघी इंडस्ट्रीजचे अधिग्रहण केले असल्याची घोषणा केली. या कंपनीची उत्पादन क्षमता आणखी 15 मिलियन टनापर्यंत वाढवता येणार आहे.
अंबुजा सिमेंटचा विस्तार वाढणार
सांघी इंडस्ट्रीडकडे सध्या मोठ्या प्रमाणात चूनखडीचा साठा उपलब्ध आहे. ज्यामुळे अदानींच्या सिमेंट निर्मिती उद्योगास मोठा फायदा होणार आहे. या व्यवहारानंतर अदानी उद्योग समुहातील अंबुजा सिमेंट आणि तिची उपकंपनी ACC यांची सिमेंट निर्मिती क्षमता आणखी वाढणार आहे. या विस्ताराने अंबुजा सिमेंटची क्षमता प्रति वर्ष 67.5 मिलियन टनावरून 73.6 मिलियन टन होईल. तसेच 2028 पर्यंत सिंमेंट निर्मितीची क्षमता दुप्पट करण्याचे अदानी उद्योग समुहाचे लक्ष्य आहे. दरम्यान, सांघी इंडस्ट्रीजमध्ये अंबुजा सिमेंट 300 कोटींची गुंतवणूक करणार आहे.