• 27 Mar, 2023 05:47

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank Sakhee : गावातल्या लोकांना आणि बचत गटांना बँकिंग व्यवहारात मदत करणारी सखी

Mahila Bachat Gat/Bank Sakhee

Image Source : Priti Bahurupi

Bank Sakhee : सरकारच्या पाठिंब्याने गावात अनेक बचत गट(Bachat Gat) तर स्थापन झाले आहेत. पण, अजूनही त्यातल्या अनेकांना उत्पादन वाढवण्यासाठी बँकांची मदत कशी घ्यायची, कर्ज (loan) कसं मिळवायचं, तयार माल कसा खपवायचा याची माहिती नाही. अनेकांना बँकिंग व्यवहारच (Banking transactions) ठाऊक नाहीत. अशा महिलांना मदत करायला सरकारने नेमलीय बँक सखी. त्यांचं काम कसं चालतं आणि कोणाला बँक सखी होता येतं बघूया…

अकोला (Akola) शहरातली गोष्ट आहे. वर्षाताईंच्या (नाव सूचनेवरून बदलले आहे) यजमानांचं एप्रिल 2020 मध्ये कोरोना काळात निधन झालं. त्या जिथे कामाला जात होत्या ते काम कोरोनामुळे आधीच सुटलं होतं. घरात दोन मुलं. आणि वयोवृद्ध सासू. त्यामुळे वर्षाताईंसमोर मोठंच आर्थिक संकट (financial crisis) होतं. आधी त्या एका कारखान्यात शिवणकाम करत होत्या.

पण, आता ते काम सुटलं होतं. आणि लॉकडाऊनमुळे अगदी कुणाच्या घरी जाऊन घरकामही करता येणार नव्हतं. असं संकट उभं असताना त्यांच्या मैत्रिणीने त्यांना एका बचत गटाविषयी सांगितलं. तिथून काही मदत मिळते का बघ असं मैत्रिणीचं म्हणणं होतं.

बचत गटातून काही मदत नाही मिळाली. पण, तिथे वर्षाताईंना एक ‘सखी’ जरुर भेटली. या सखीने स्वत:हून त्यांना आपली ओळख करून दिली. आणि ताईंची पार्श्वभूमी अगदी नीट समजून घेतली. अर्धा तास बोलणं झाल्यावर या ‘सखीने’ वर्षाताईंसमोर एक योजनाच ठेवली.

सखी म्हणाली, ‘वर्षाताईंनी बँकेकडून शिवणंत्र विकत घेण्यासाठी कर्ज घ्यायचं. शिवाय इतर साहित्यासाठीही काही पैसे घ्यायचे. त्यासाठी जी कागदपत्रं आणि इतर गोष्टी लागतील त्यासाठी मी मदत करणार. आणि मग स्वत:चाच उद्योग सुरू करायचा.’ वर्षाताईंनी हे मनातही आणलं नव्हतं. अनोळखी व्यक्तीवर विश्वासा ठेवावा की नाही, असाही प्रश्न होता.

ते समजल्यावर सखीने आपली आणखी सखोल ओळख करून दिली. ‘मी वनिता जाधव! मी बँकसखी आहे. आणि बचत गट तसंच तुमच्या सारख्या गरजू महिलांना मदत करणं हेच माझं काम आहे. हे पाहा माझं ओळखपत्र!’ आता अविश्वास दाखवण्यासारखं फारसं काही उरलं नव्हतं. शिवाय वर्षाताईंना नव्हती तरी तिथे जमलेल्या बचत गटाच्या इतर बायकांना ही ‘बँकसखी’ माहीत होती. त्यामुळे वर्षाताईंनी सखीचं म्हणणं ऐकलं. आणि त्यांना बँकेच्या कर्जातून शिवणयंत्र मिळालंही.

वर्षाताईंचा स्वतंत्र व्यवसाय सुरू झाला. त्या ज्या बचत गटात काम मिळतं का म्हणून आल्या होत्या तो बचत गटही बँकसखीकडून कर्ज आणि मालाच्या विक्रीसाठी मदत घेतच होता.

जशी एक बाजू वर्षाताईंची होती तशीच बँकसखीचीही होती….. 

संगीता आमटे या अमरावतीतल्या राजुरा बाजार गावच्या रहिवासी. कोरोनापूर्व काळात मजुरी करत होत्या. पण, त्यातून कुटुंबाचा खर्चही भागत नव्हता. वर सकाळ - संध्याकाळ उन्हातान्हात राबावं लागत होतं. पण, त्यांना कुणीतरी बँकसखीबद्दल सांगितलं. दहावीपर्यंतचं शिक्षण गाठीशी होतं. आणि कुटुंबाची आर्थिक अडचण तर बघवत नव्हती.

त्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन बँकसखी होण्यासाठी परीक्षा दिली. आणि चक्क त्या उत्तीर्ण झाल्या. आपल्या जवळच्या बारा गावांची जबाबदारी घ्यायची. तिथल्या महिला आणि बचत गटांना बँकिंग व्यवहार आणि बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी मदत करायची, सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करायलाही मदत करायची हे त्यांचं काम होतं.

women-are-getting-employment-through-bank-sakhi-schemes-3.jpg
Priti Bahurupi 

‘सुरुवातली लोकांमध्ये (त्या अगदी बायका असल्या तरी) मिसळायलाही संकोच वाटायचा. धड सलग चार ओळीही बोलता यायच्या नाहीत. पण, बँकेचे मॅनेजर भक्कम उभे होते. आणि काहीतरी करायची हीच संधी आहे हे लक्षात आलं होतं. त्या जीवावर तीन वर्षं काम सुरूच ठेवलं,’ संगीता यांनी महामनीशी बोलताना आपला अनुभव सांगितला.

तीन वर्षं अशीच गेली आणि आज त्यांचा आत्मविश्वास बघण्यासारखा आहे.. 

‘बँक सखी म्हणून माझ्यात झालेले बदल तुमच्यासमोर आहेत. आता मी स्वत: गावोगावी जाते. लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना बँकेतर्फे मदत करण्याचा प्रयत्न करते. कोरोनाच्या काळातही शेकडो घरं आणि बचत गटांना मी भेटी दिल्या. आणि लाखो रुपये कर्जाचे केस पेपर तयार केले,’ संगीता अगदी सहज हे सांगत होती.

women-are-getting-employment-through-bank-sakhi-schemes-1.jpg

थोडक्यात, काय बँकसखी योजनेमुळे हजारो सखींचे संसार उभे राहिले आहेत. तर सखींमुळे हजारो महिलांचे. देशभर ही संकल्पना केंद्रसरकारच्याच एका योजनेअंतर्गत राबवली जात आहे.

मग तुम्हालाही बँक सखी होता येईल का?

महिलांना फक्त चूल आणि मूल इतकंच मर्यादित ठेवण्याची पद्धत आता दिवसेंदिवस लयाला जात आहे. अनेक महिला आपले कुटुंब एकट्या सांभाळतात. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे बँक सखी योजना.

या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची संधी  दिली जाते. बँक सखी महिला बचत गटाला लोन मिळवून देणे, विमा काढून देणे, अकाऊंट ओपन करून देणे इत्यादि कामे करते. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान (Maharashtra State Rural Livelihood Campaign) अर्थात एमएसआरएलएमची सुरुवात महाराष्ट्रामध्ये 2011 मध्ये  झाली. त्यानंतर पाच टप्प्यांमध्ये संपूर्ण राज्यभर हे अभियान सुरू झाले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियानानंतर्गत बँक सखीची निवड केली जाते.

women-are-getting-employment-through-bank-sakhi-schemes-1-1.jpg
Dipika Akotkar 

बँक सखी काय आहे?

पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना बँक सखी म्हणून नियुक्त केले जाते. यासाठी जागा निघाल्यानंतर पंचायत समितीमध्ये अर्ज करावा लागतो. त्यानंतर पेपर जिल्हाच्या ठिकाणी त्याचा पेपर द्यावा लागतो. त्यात पास झाल्यानंतर बँक सखी म्हणून तुमची नियुक्ती केली जाते. नियुक्तीनंतर आठ दिवसाचे ट्रेनिंग देऊन काम समजवल्या जाते.

त्यातुन तुम्ही कामाला सुरवात करू शकता. ज्यांच्या घरापासून आणि गावापासून बँक दूर आहे, ज्यांना बँकेत जाणे शक्य होत नाही अशा लोकांना त्यांची कामे करून देणारी नियुक्त महिला म्हणजे बँक सखी असे आपण म्हणू शकतो.

बँक सखीच्या कामाचे स्वरूप आणि मानधन

बँक सखीला 12 गावांचे काम पाहावे लागते. त्यात बचत गटांना लोन, अकाऊंट ओपन करून देणे, विमा काढून देणे, महिलांना आर्थिक साक्षर बनवणे इत्यादि कामे करावी लागतात. कोरोना काळात गावोगावी जाऊन ही सर्व कामे नियमाचे पालन करून बँक सखीला करावी लागली. या कामासाठी त्यांना 3000 रुपये मानधन पंचायत समिती  कडून दिले जाते. आधी दर सहा महिन्याला हे मानधन यांना दिले जात होते आता दर तीन महिन्याला दिले जाते.

women-are-getting-employment-through-bank-sakhi-schemes-4-2.jpg
Dipika Akotkar 

बीसी सखी काय आहे?

बीसी सखी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात घरोघरी बँकिंग सेवा दिली जाणार आहे. जेणेकरून लोकांना घरी बसून बँकिंग सुविधा मिळण्याचा लाभ मिळेल आणि त्यामुळे अनेक महिलांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. ग्रामीण भागात घरोघरी बँकिंग सेवा देणाऱ्या महिलेला बीसी सखी म्हणतात.

बँक सखी आणि बीसी सखी

बँक सखी आणि बीसी सखीमध्ये काय फरक आहे, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एकापेक्षा जास्त बचत गट आहेत. या गटातून फक्त एका महिलेची बँक सखी म्हणून निवड करण्यात येते. बँक सखी बँकेच्या शाखेत बसते. बचत गटातील सदस्यांना आर्थिक व्यवहारात मदत करणे हे त्यांचे काम आह

बँक सखीच्या माध्यमातून अनेक महिलांनी केले घरगुती उद्योग स्थापन….. 

दीपिका आकोटकर या अमरावती जिल्ह्यातील बँक सखी आहे. कोरोंना काळात गावातील सर्व आर्थिक व्यवहार (Financial transactions) यांच्या माध्यमातून झाला. अनुभव सांगतांना त्या म्हणाल्या की, महिलांना आर्थिक साक्षर बनवणे फार महत्वाचे काम आहे. कोरोंना काळात याबाबत अनेकांमध्ये जागरूकता आली पण ज्यांना कधी घरातील व्यवहार बघावेच लागले नाही अशांना बचत, गंतवणूक याबाबत माहित नसते. 

आपत्तीच्या काळात हवा असलेला पैसा बचतीमधून येतो हे पटवून देण्यासाठी बचत गटाचे प्रशिक्षण घेतले. अनेक महिलांना किराणा दुकान, शेवळ्याची मशीन इत्यादि घरगुती उद्योगासाठी लोन उपलब्ध करून दिले. माझ्यामुळे अनेकांना मदत झाली यात मी समाधानी आहे.