Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Highest Home Rent: 'या' शहरात एका महिन्याचे घर भाडे चक्क 3 लाख रुपये! जाणून घेण्यासाठी वाचा

Property at london

Image Source : www.propertyguides.com

Highest Home Rent: प्रॉपर्टी पोर्टल राइटमूव्हने असे म्हटले आहे की, 2023 मध्ये संपूर्ण ब्रिटनमध्ये भाडे आणखी 5 टक्क्यांनी वाढेल, कारण घर भाड्याने घेऊ इच्छिणार्‍यांची संख्या आणि उपलब्ध भाड्याने मिळणाऱ्या मालमत्तेची संख्या यांच्यात सतत असमतोल आहे.

Highest Home Rent: ब्रिटनची राजधानी असलेले लंडन(Landon) शहर अतिशय महागडे शहर म्हणून ओळखले जाते. याच शहरात घर भाड्याने घेणे सुद्धा अतिशय महाग आहे. सध्या लंडनमध्ये घरमालक 3 लाख रुपयाच्या भाड्याची मागणी करत असून ही भाड्याची रक्कम आणखी वाढू शकते. लंडनमध्ये, बरेच लोक आधीच वाढत्या विजेच्या दरांसोबत दैनंदिन खर्च संतुलित करण्यासाठी कसरत करत आहे. त्यामध्येच सामान्य नागरिकांसाठी ही भाडेवाढ डोकेदुखी ठरली आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

3 लाखावर घराचे भाडे

Telegraph.uk च्या अहवालानुसार, गेल्या वर्षी लंडनमधील घरभाडे हे महिन्याला 2,50,000 रुपयांच्या सरासरी उच्चांकावर पोहोचले होते. Telegraph.uk च्या मते, घरमालक दरमहा £1,172 चे भाडे मागत आहेत. येत्या काही महिन्यांत हे दर आणखी वाढतील, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. प्रॉपर्टी पोर्टल राइटमूव्हने असे म्हटले आहे की, 2023 मध्ये संपूर्ण ब्रिटनमध्ये भाडे आणखी 5 टक्के वाढेल, कारण घर भाड्याने घेऊ इच्छिणार्‍यांची संख्या आणि उपलब्ध भाड्याने मिळणाऱ्या मालमत्तेची संख्या यांच्यात सतत असमतोल आहे. ताज्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी लंडनबाहेर नव्याने सूचीबद्ध केलेल्या मालमत्तेसाठी सरासरी भाडे 9.7 टक्क्यांसह नोंदवले गेल्याची ही दुसरी सर्वोच्च वार्षिक भाडेवाढ आहे. 2021 मध्ये 9.9 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवल्यानंतर 2023 मध्ये ही वाढ झाल्याचे आउटलेट यावृत्ताने सांगितले आहे. या भाडेवाढीचा समतोल राखणे गरजेचे आहे.

पार्कींगच्या जागेतून 7,000,000 कमावले

भाड्याचे दर इतके जास्त आहेत की, काही लोक अतिरिक्त पैसे कमावण्यासाठी पार्किंगच्या जागेचा वापर करत आहेत. काही दिवसांपूर्वी, मेट्रो न्यूजमधील एका अहवालात असे म्हटले आहे की, लंडनच्या एका बँकरने पूर्व लंडन येथील त्याच्या घरातील दोन न वापरलेल्या पार्किंगच्या जागा 6 वर्षांसाठी भाड्याने देऊन 7,000,000 रुपये  कमावले आहेत. तो दरमहा 10,000 रुपयामध्ये जागेची जाहिरात करतो.