Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Kisan Scheme : महाराष्ट्रातील 85.66 लाख शेतकरी PM Kisan योजनेच्या 14 व्या हप्त्याचे लाभार्थी; 1866.40 कोटी खात्यात

PM kisan

आज पंतप्रधानांच्या हस्ते देशभरातील शेतकऱ्यांना PM Kisan या योजनाचा 14 वा हप्ता वितरीत करण्यात आला. या हप्त्याच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून सुमारे 8.5 कोटी शेतकऱ्यांना 17000 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तब्बल 85.66 लाख शेतकरी या हप्त्याचे लाभार्थी ठरले असून सुमारे 1866.40 कोटी रुपये थेट लाभार्थी शेतकऱ्यांचे खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत.

PM Kisan Yojana : केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM Kisan) या योजनेतून देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. आज पंतप्रधानांच्या हस्ते देशभरातील शेतकऱ्यांना या योजनाचा 14 वा हप्ता वितरीत करण्यात आला. या हप्त्याच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून सुमारे 8.5 कोटी  शेतकऱ्यांना 17000 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. या योजनेमधून महाराष्ट्रातील तब्बल 85.66 लाख शेतकरी या हप्त्याचे लाभार्थी ठरले असून सुमारे 1866.40 कोटी रुपये थेट लाभार्थी शेतकऱ्यांचे खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत.

वार्षिक 6 हजार रुपये मदत

राजस्थान मधील सीकर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) 14 वा हप्ता वितरीत करण्यात आला आहे.  शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी अर्थसाहाय्य म्हणून फेब्रुवारी 2019 मध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये मदत देण्यात येते. यासाठी वर्षातून 2000 रुपयांचे तीन हप्ते वितरीत केले जातात. आज केंद्र सरकारकडून PMKISAN योजनेतील एप्रिल ते जुलै 2023 च्या 14 व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले.

2.59 लाख कोटींचे वितरण

केंद्र सरकारने PMKISAN योजना सुरू केल्यापासून  आजपर्यंत लाभार्थ्यांना एकूण 2.59 लाख कोटींहून अधिक रक्कम हस्तातरीत केली आहे. ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात मदत ठरेल आणि त्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी हातभार लावेल, असा विश्वास सरकारकडून व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्रातील 14,28,000 शेतकरी ठरले अपात्र

केंद्र सरकारकडून ही योजना सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील जवळपास 14 लाख 28 हजार शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्रे सादर करत हा निधी मिळवला होता. मात्र केंद्र सरकराकडून या योजनेसाठी भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे लाभार्थ्यांची माहिती पोर्टलवर अद्ययावत करणे, त्याच सोबत आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करणे या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली असता 14 लाख 28 हजार शेतकरी अपात्र ठरले होते. सद्य स्थितीत 14 व्या हप्त्यासाठी महाराष्ट्रातील एकूण  85.66 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत.

पात्रतेचे निकष

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी जो फक्त शेती करतो असाच शेतकरी पात्र आहे. भाडेतत्वावर शेती करणारा,तसेच सरकारी नोकरदार, किंवा एखाद्या शेतकऱ्याने प्राप्ती कर भरला असेल असा शेतकरी डॉक्टर, इंजिनीअर, सीए, वकील अशा व्यावसायिकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.तसेच जर एखाद्या व्यक्तीस निवृत्तीनंतर 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळत असेल तर तोही यासाठी अपात्र आहे.