Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Features of Rs 500 note: तुमच्याकडे असलेली 500 रुपयांची नोट खरी की खोटी? जाणून घेण्यासाठी वाचा

500 rupees

Image Source : www.rbikehtahai.rbi.org.in

Features of Rs 500 note: महात्मा गांधी(Mahatma Gandhi) यांच्या 500 रुपयांच्या नोटांच्या नव्या सीरिजवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी(Reserve Bank Governor Signature) आहे. आरबीआयच्या मते, 500 रुपयांच्या नोटा ओळखण्यासाठी काही खुणा समजून घ्यायला हव्यात.

Features of Rs 500 note: सध्या बाजारपेठेत खोट्या नोटांचा सुळसुळाट फार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुमच्याकडे असलेली नोट खरी आहे की खोटी हे तपासून घ्यायचे असेल तर आता बँकेतील नोटा मोजण्याच्या मशीनपर्यंत धाव घेण्याची गरज नाही.  तुम्हाला कोणी खोटी नोट देऊन फसवू नये त्यासाठी तुम्हाला RBI ने सूचित केलेल्या नोटांवरील खुणा माहिती असायला हव्यात. जर का तुम्हाला या खुणा माहित नसतील तर मात्र बनावट नोट हाती लागल्यामुळे तुमचे 500 रुपये पाण्यात जावू शकतात.बनावट नोटांपासून वाचण्यासाठी RBI ने सूचित केलेल्या नोटांवरील खुणांची माहिती करून घेऊयात.

रिझर्व्ह बँकेच्या(RBI) मते, महात्मा गांधी(Mahatma Gandhi) यांच्या 500  रुपयांच्या नोटांच्या नव्या सीरिजवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी(Reserve Bank Governor Signature) आहे. नोटेच्या मागच्या बाजूस देशाचा सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या "लाल किल्ल्याचे" चित्रही आहे. 500  रुपयाच्या या बेस नोटेचा कलर स्टोन ग्रे असला तरी यात इतर डिझाईन्स आणि भौमितिक पॅटर्नही वापरले आहेत. आरबीआयच्या(RBI) मते, 500 रुपयांच्या नोटा ओळखण्यासाठी काही खुणा समजून घ्यायला हव्यात. या खुणांच्या आधारावर तुम्ही 500 रुपयांच्या बनावट नोटा सहज ओळखू शकता.

500 रुपयाच्या नोटेचे वैशिष्ट्य

  • नोटेचा आकार 66 मिमी x 150 मिमी आहे
  • या नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचे(Mahatma Gandhi) चित्र आहे 
  • नोटेवर देवनागरी संप्रदायाचा 500 हा अंक आहे 
  • छोट्या अक्षरात 'भारत(Bharat)' आणि 'इंडिया(India)' असं देखील लिहिण्यात आले आहे 
  • नोटेच्या उजव्या बाजूला अशोक स्तंभाचे(Ashok Stanbh) प्रतीक आहे
  • 500 रुपयांच्या नोटेच्या डाव्या बाजूला नोटेच्या छपाईचे वर्ष(Printing Year) नोंदवण्यात आले आहे
  • नोटमध्ये स्वच्छ भारत लोगोचं स्लोगन(Swachh Bharat Logo Slogan) देखील ऍड करण्यात आले आहे
  • 'भारत' आणि 'आरबीआय' शिलालेखांसह कलर शिफ्ट विंडोसह सिक्योरिटी थ्रेट(Security Thread) या नोटेवर तुम्हाला पाहायला मिळेल 
  • 500  ची नोट वाकवली की नोटेमधील धाग्याचा रंग हिरवा(Green) ते निळा(Blue) असा बदलताना दिसेल
  • गारंटी क्लॉज, प्रॉमिस क्लॉजसोबत गव्हर्नरची स्वाक्षरी असलेलं आणि  महात्मा गांधींचं चित्र, RBI चं प्रतीक यामध्ये आहे 
  • यावर महात्मा गांधी यांचे चित्र आणि इलेक्ट्रोटाइप(Electrotype) (500) वॉटरमार्क(Watermark) आहे
  • नोटेच्या वरच्या डाव्या आणि खालच्या उजव्या बाजूला जाणाऱ्या फॉन्टमध्ये अंक असलेले नंबर पॅनेल स्वरूपात आहेत 
  • खालील उजव्या बाजूला रुपयाचे चिन्ह (500) रंग बदलणारी शाई (हिरवी ते निळी) असलेला अंक दिसेल