Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Post Office Time Deposit : 5 लाख गुंतवा अन् 2.25 लाख व्याज मिळवा, शिवाय आयकरही वाचवा

Post Office Time Deposit : 5 लाख गुंतवा अन् 2.25 लाख व्याज मिळवा, शिवाय आयकरही वाचवा

Post Office Time Deposit Calculator 2023 : पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट योजना ही गुंतवणूकदारांसाठी एक चांगला परतावा देणारी योजना आहे. 5 लाख रुपये गुंतवून या योजनेच्या माध्यमातून 2.25 लाख रुपये व्याज मिळवता येवू शकतं. खात्रीशीर उत्पन्नाची हमी असलेली ही योजना आहे.

विविध लहान बचत योजनांचे (Small saving schemes) व्याजदर (Interest rate) बदलण्यात आलेत. नवीन आर्थिक वर्ष 2023-24मध्ये सरकारनं हे बदल केलेत. पब्लिक प्रॉव्हिडंट फंट वगळता सर्वच बचत योजनांच्या व्याजदरात 1 एप्रिलपासून 10-70 बेसिक पॉइंट्सनी वाढ केलीय. लहान गुंतवणूकदारांसाठी अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट योजना होय. गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित, हमी असलेली आणि प्राधान्य दिलेली लोकप्रिय अशी परतावा देणारी पोस्ट ऑफिसची ही एक योजना आहे. 1 एप्रिल 2023 पासून सरकारनं पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेतला व्याज दर 5 वर्षांच्या कालावधीसाठी 7.5 टक्के वार्षिक करण्यात आलाय. आधी तो 7 टक्के इतका होता.

किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक

ही एक लहान बचत योजना असल्यानं गुंतवणूकदार एका वर्षापासून पाच वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकतात. मॅच्युरिटीनंतर या योजनेतली गुंतवणूक आणखी वर्षभरासाठी वाढवता येवू शकेल. किमान 1000 रुपये गुंतवून ही योजना सुरू करता येईल. या 1000 हजारांच्या वर 100च्या पटीत गुंतवणूक करता येईल, अशी ही योजना आहे. महत्त्वाचं म्हणजे, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. टाइम डिपॉझिट योजनेंतर्गत संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 3 प्रौढ व्यक्ती असलेली एकल किंवा संयुक्त दोन्ही खात्यांना समाविष्ट केली जाऊ शकतात.

टाइम डिपॉझिट कॅल्क्युलेटर

एखाद्या व्यक्तीनं 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवले, तर त्यास 2,24,974 रुपये व्याज आणि मॅच्युरिटीवर एकूण 7,24,974 रुपये मिळतील. 7.5 टक्क्यांच्या व्याज दरानं हा परतावा असणार आहे. याआधी 7 टक्के व्याज दरानं गुंतवणूकदारांना सुमारे 2,07,000 रुपये मिळत होते. आता व्याजातल्या दराच्या वाढीमुळे या ठेवींमध्ये जवळपास 18,000 रुपयांची वाढ झालीय.

कोण उघडू शकतं पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खातं?

  • प्रौढ व्यक्ती (एक)
  • 3 प्रौढ व्यक्ती संयुक्त खातं तयार करू शकतात
  • अल्पवयीन किंवा 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अल्पवयीन मुलाचं त्याचे पालक खातं उघडू शकतात
  • मानसिक अस्वस्थ व्यक्ती याच्या वतीनं त्याचे पालक
  • एखादी व्यक्ती हवी तेवढी खातीदेखील उघडू शकतो.

ठेव कालावधी, कार्यकाळ

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खातं 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे किंवा 5 वर्षांच्या कालावधीसाठी उघडली जाऊ शकतात. तर अर्ज देऊन मुदतपूर्तीनंतर ठेवीचा कालावधी एका वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो.

जमा रक्कम

पोस्ट ऑफिस टीडी खाते किमान 1000 आणि त्‍याच्‍यानंतर 100च्या पटीत उघडता येतं. यातल्या गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही.

व्याज

पोस्ट ऑफिस टीडी खात्यावर व्याज दरवर्षी दिलं जाणार. खातेदारानं अर्ज सादर केल्यावर वार्षिक व्याज त्यांच्या बचत खात्यात जमा केलं जातं. मॅच्युरिटी झाल्यावर देय असलेल्या व्याजावर कोणतंही अतिरिक्त व्याज दिलं जाणार नाही.

करात सूट - 80C अंतर्गत कर बचत

5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खात्यांसाठी केलेली गुंतवणूक आयकर कायदा, 1961च्या कलम 80C अंतर्गत सूट मिळण्यास पात्र ठरतं.

मुदतीपूर्वी पैसे काढल्यास 

  • ठेवी ठेवल्यापासून सहा महिन्यांच्या आत कोणत्याही परिस्थितीत ठेवी काढता येत नाहीत
  • खातं 6 महिने आणि 1 वर्षाच्या दरम्यान बंद असल्यास पोस्ट ऑफिस बचत खात्यावर व्याज दर लागू होईल
  • 2 किंवा 3 किंवा 5 वर्षांचं टाइम डिपॉझिट खातं 1 वर्षानंतर मुदतीपूर्वी बंद केलं असेल, तर देय व्याज पूर्ण वर्षांच्या कालावधीसाठी लागू असलेल्या व्याज दरापेक्षा 2 टक्के कमी असेल

'असं' बंद करा खातं?

टाइम डिपॉझिट खातं बंद करण्याची प्रक्रियाही सोपी आहे. संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह विहित अर्ज सादर करून खातं मुदतीपूर्वी बंद केलं जाऊ शकतं (पहिले सहा महिने वगळता).