Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google India Lay Off: गुगल इंडियाकडून भारतातील 453 कर्मचाऱ्यांना रातोरात नारळ

Google India Layoff 453 Employee

Google Indian Lay Off: गुगलने भारतातील वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला असून, सुमारे 453 कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे.

Google Layoff 2023: गुगलने गेल्या काही दिवसांत सतत कर्मचारी कपात करण्याची मोहिम सुरू ठेवली आहे. यावेळी गुगलने भारतातील वेगवेगळ्या विभागातील सुमारे 453 कर्मचाऱ्यांना रातोरात कमी करण्यात आले आहे. गुगलने कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे याच माहिती दिल्याचे, बिझनेस लाईन वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

2023 च्या सुरूवातीलाच कर्मचारी कपातीचे संकेत! 

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai, Google CEO) यांना मागे एकदा 2023 मधील कर्मचारी कपातीबद्दल विचारण्यात आले होते तेव्हा त्यांनी, भविष्यातील गोष्टी आता सांगणे अवघड असल्याचे म्हटले होते. तसेच 2023 च्या सुरूवातीलाच गुगलने जवळजवळ 1200 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचे संकेत दिले होते. जागतिक आर्थिक मंदीमुळे गुगलने ही घोषणा त्यावेळी केली होती. त्याचीच ही प्रचिती असल्याचे म्हटले जात आहे. कारण त्यानंतर गुगलने इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली.

कपात कर्मचाऱ्याची सोशल मिडियावरील पोस्ट व्हायरल  

गुगलच्या गुरगाव येथील ऑफिसमध्ये अकाऊंट मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या कमल दवे, या कर्मचाऱ्याने आपल्या लिंकेडिनच्या प्रोफाईलवर (Kamal Dave, Account Manager, Google) नोकरीतून काढून टाकल्याची पोस्ट शेअर केली. कमल दवे याने पोस्टमध्ये नमूद केले की, गुगल इंडियाने केलेल्या कर्मचारी कपातीचा मी एक भाग आहे. याचा फटका मला देखील बसला आहे. याचबरोबर त्याने नोकरीच्या इतर पर्यायांबद्दल आणि संधीबद्दलही विचारणा केली.

गुगलने भारतातील वेगवेगळ्या शहरांमधून लेव्हल फॉर सॉफ्टवेअर डेव्हलपर, बॅकएंड डेव्हलपर, क्लाऊड इंजिनिअर आणि डिजिटल मार्केटर म्हणून काम करत होते. कपात करण्यात आलेले बहुतांश कर्मचारी हे हैदराबाद आणि बंगळुरूमधील आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना गुगल इंडियाने मेल पाठवून ही माहिती दिली.

कर्मचारी कपातीची जबाबदारी स्वीकारली

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलमध्ये कर्मचारी कपातीच्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे म्हटले आहे. तसेच गुगलने केलेली कर्मचारी कपात ही जागतिक पातळीवर करण्यात आली आहे. कंपनीच्या खर्चात कपात करण्यासाठी आणि ग्राहकांना चांगली सेवा देण्यास प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. कर्माचारी कपातीच्या निर्णयाचा परिणाम इंग्लंडमधील कर्मचाऱ्यांसाठी अवघड जाणार आहे. कारण इंग्लंडमधील अर्थव्यवस्था खूपच डबघाईला आली आहे. तिथल्या नोकऱ्यांवर पूर्वीपासूनच गदा आहे. त्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

जगभरातील मोठ्या कंपन्यांकडून कर्मचारी कपात

सध्या जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांकडून जसे की, गुगल, फेसबुक, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात लागू केली आहे. सध्याचा ट्रेण्ड पाहता दिवसाला 3 हजार जणांच्या नोकऱ्या जात आहेत. कोरोना येण्यापूर्वी या सर्व मोठ्या कंपन्या जोमात सुरू होत्या. पण कोरोनानंतर या कंपन्यांना उतरता कळा लागली. परिणामी अनेक कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला. त्यामुळे या 6 महिन्यात मोठमोठ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून कमी केले.

फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी आतापर्यंत 13% म्हणजे 11 हजार कर्मचारी कपात केली आहे. ट्विटरने साडेसात हजार, अॅमेझॉनने 18 हजार  कर्मचारी कमी करण्याची घोषणा केली. तर मायक्रोसॉफ्टने 10 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला. जानेवारीच्या पहिल्या पंधरा दिवसांत जगभरातील कंपन्यांनी  1 लाख 24 हजार कर्मचारी काढले, तर 2022 मध्ये 1 लाख  53 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले होते.

जॉब मिळवून देणाऱ्या कंपनीकडूनच नोकरकपात

प्रोफेशनल जॉब करणारे लिंक्डइनवर बऱ्यापैकी सक्रिय असतात. अनेक जण चांगली नोकरी मिळवण्यासाठी लिंक्डइनचा वापर करतात. पण सध्या लिंक्डइनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. त्यांनीही नोकर कपातीची घोषणा केली.

बदलत्या तंत्रज्ञानाचाही कर्मचारी कपातीवर परिणाम!

पूर्वी तंत्रज्ञानाचा वापर कामामध्ये सुलभता आणण्यासाठी केला जात होता. पण आता त्याच तंत्रज्ञानाने कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आणली आहे. काही वर्षांपूर्वी कॉम्प्युटरच्या वापरामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आली होती. त्याचप्रमाणे आता आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स सारख्या तंत्रज्ञानामुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेतील टेक कंपन्यांमध्ये सुमारे 42,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. ही आतापर्यंतची दुसरी सर्वात मोठी कर्मचारी कपात मानली जाते. याचा सर्वाधिक फटका भारतीय कर्मचाऱ्यांना बसला आहे.