Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LinkedIn layoff: इतरांना जॉब मिळवून देणाऱ्या LinkedIn कंपनीवर नोकरकपातीची वेळ

Microsoft layoff

नोकरी व्यवसाय करणाऱ्यांमध्ये लिंक्डइन चांगलेच प्रसिद्ध आहे. अनेकांना लिंक्डइनवरुन नोकरी मिळते. मात्र, आता लिंक्डइनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच जॉब गमावण्याची वेळ आली आहे. लिंक्डइन ही मायक्रोसॉफ्ट ग्रुपमधील कंपनी आहे. जानेवारी महिन्यात विविध कंपन्यांमधील दहा हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याची घोषणा मायक्रोसॉफ्टने केली होती.

LinkedIn layoffs: नोकरी व्यवसाय करणाऱ्यांमध्ये लिंक्डइन चांगलेच प्रसिद्ध आहे. अनेकांना लिंक्डइनवरुन नोकरी मिळते. मात्र, आता लिंक्डइनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच जॉब गमावण्याची वेळ आली आहे. लिंक्डइन ही मायक्रोसॉफ्ट ग्रुपमधील कंपनी असून काही दिवसांपूर्वी 10 हजार नोकर कपातीची घोषणा केली होती. मायक्रोसॉफ्टने (Microsoft layoff)  आपल्या विविध कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यास सुरुवात जानेवारी पासून सुरू केली आहे.

जागतिक मंदीचा परिणाम युरोप अमेरिकेवर सर्वाधिक झाला आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्र होरपळून निघाले आहे. लिंक्डइनमधील ह्युमन रिसोर्स विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्याची माहिती समोर येत आहे. नक्की किती कर्मचाऱ्यांना काढून टाकले याची माहिती मिळाली नाही. गुगल, अॅमेझॉन, सेल्सफोर्स, फेसबुक अशा बड्या कंपन्यांनीही कर्मचारी कपात केली आहे.

मायक्रोसॉफ्ट ग्रुपमधील होलोलेन्स, सरफेस, झेबॉक्स या कंपन्यांमधूनही कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. सियाटल ऑफिसमधील सहाशेपेक्षा जास्त कर्मचारी नुकतेच कमी केले आहेत. होलोलेन्स ही मिक्स रिआलिटी हेडसेटवर काम करणारी मायक्रोसॉफ्टची कंपनी असून कर्मचारी कपातीमुळे या प्रकल्पाचे भवितव्य अंधारात गेले आहे. तसेच गिटहब या मायक्रोसॉफ्टच्या आणखी एका कंपनीने 10% कर्मचारी कमी केले. कंपनीने अनेक कार्यालये कायमची बंद देखील केली आहेत.

जानेवारीमध्ये केली होती घोषणा (Microsoft layoff announcement in January)

10 हजार कर्मचारी कपातीची घोषणा मायक्रोसॉफ्ट कंपनीने जानेवारी महिन्यात केली होती. त्यानुसार विविध कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येत आहे. ज्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमी आहे, अशा कर्मचाऱ्यांना कमी करण्यावर कंपन्यांचा भर आहे. जागतिक कामगारांच्या 5% कर्मचारी कपातीचा निर्णय मायक्रोसॉफ्टने घेतला होता. व्यवसायातील मंदीमुळे मायक्रोसॉफ्टचा नफा रोडावला आहे. त्यामुळे कंपनीने खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला. 

आघाडीच्या कंपन्यांकडून कर्मचारी कपात (IT and Tech layoff)

फेसबुक कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी 13% म्हणजेच 11 हजार कर्मचारी कपात केली आहे. तर ट्विटरचे प्रमुख एलन मस्क यांनी साडेसात हजार कर्मचारी कपात केली. अॅमेझॉननेही 18 हजार कर्मचारी कमी करण्याची घोषणा केली. तर मायक्रोसॉफ्टने 10 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला. जानेवारीच्या पहिल्या पंधरा दिवसांत जगभरातील कंपन्यांनी 1 लाख 24 हजार कर्मचारी काढले, तर 2022 मध्ये 1 लाख  53 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले. कोरोना काळात आयटी कंपन्यांच्या नफ्यात अचानक वाढ झाली होती. मात्र, त्यास उतरती कळा लागली आहे.