LIC Aadhaar Shila Scheme: भारतीय आयुर्विमा महामंडळाने LIC आधार शिला योजना (LIC Aadhaar Shila Scheme) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, पॉलिसीधारकाला मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक कालावधीत प्रीमियम भरावा लागतो. LIC आधारशिला योजना लाइफ इन्शुरन्स सोबतच बचत योजनाही आहे. पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचे निधन झाल्यास, योजना त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देते. विमाधारकाने संपूर्ण मॅच्युरिटी कालावधी पूर्ण केला तर, मॅच्युरिटी बेनिफिटसुद्धा मिळते. या योजनेअंतर्गत तुम्ही लोन आणि कार इन्शुरन्स घेऊ शकता.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या 30 व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तो दररोज 58 रुपये जमा करून यात गुंतवणूक करू शकते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने LIC आधारशिला योजनेत एका वर्षात 21,918 रुपये गुंतवले तर 20 वर्षांत गुंतवणूकदार 4,29,392 रुपयांची गुंतवणूक करेल. गुंतवणूकदाराला 20 वर्षांनंतर 7,94,000 रुपये मिळतील.
विमाधारकाने आत्महत्या केल्यास..
LIC च्या आधारशिला योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आवश्यक असेल. या दीर्घकालीन बचत योजनेतील महिला गुंतवणूकदारांसाठी वयोमर्यादा 8 वर्षे ते 55 वर्षे गरजेचे आहे. एलआयसीच्या या योजनेंतर्गत तुम्ही त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर गुंतवणूक करू शकता. तुम्ही या योजनेत किमान 10 वर्षे आणि कमाल 20 वर्षे गुंतवणूक करू शकता. विमाधारकाने आत्महत्या केल्यास, अशा परिस्थितीत लाभार्थ्याला भरलेल्या प्रीमियमच्या फक्त 80% रक्कम मिळेल.
विमाधारकाने मॅच्युरिटी कालावधी पूर्ण केल्यास विमाधारक मॅच्युरिटीवरील मूळ विम्याची रक्कम लॉयल्टी बेनिफिट्ससह मिळेल. विमा कमाल 20 वर्षांसाठी असतो. पॉलिसीच्या मुदतपूर्तीनंतर, पॉलिसीधारक पैसे एकाच वेळी दुसर्या पॉलिसीमध्ये गुंतवू शकतो. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, पॉलिसीच्या नॉमिनीला मृत्यू लाभ दिला जातो.
एलआयसी आधार शिला योजनेवर लोन घेऊ शकता
या योजनेवर पॉलिसीधारकांना पॉलिसीवर कर्ज देखील मिळू शकते. हे कर्ज पॉलिसीच्या नियमांनुसार मिळते. इनफोर्स पॉलिसींसाठी एकूण रकमेच्या 90% पर्यंत आणि पेड अप पॉलिसींसाठी 80% पर्यंत कर्ज दिले जाते. व्याजासह कर्ज परत घेतले जाते.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- आईडी कार्ड
- पासपोर्ट साइज फोटो
- ड्रायव्हींग लायसन्स
- इलेक्ट्रिसिटी बिल
- रेशन कार्ड
- हेल्थ रेकॉर्ड