2023 in Big Change Rules: 1 जानेवारी 2023 पासून इन्शुरन्स, क्रेडिट कार्ड अशा काही आर्थिक गोष्टींची संबंधित नियमांमध्ये मोठे बदल होणार आहे. तत्पूर्वी नवीन वर्षात आर्थिक नियोजन करण्यासाठी या आर्थिक बाबींशी संबंधित नवीन नियम जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे हे नवीन बदल काय होणार आहे, हे थोडक्यात जाणून घेऊयात.
एसबीआय कार्ड्सवरील रिवॉर्ड पॉईंट्समध्ये बदल
1 जानेवारी 2023 पासून एसबीआय कार्ड्सवरील रिवॉर्ड पॉईंट्समध्ये बदल करण्यात येणार आहे. कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षात ॲमेझॉनवर एसबीआय कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्क्यांच्या जागी फक्त 5 टक्के रिवॉर्ड पॉईंट्स मिळणार. मात्र लेंसकार्ट, बुक माय शो, क्लीअर ट्रिप, इजीडायनर, नेटमेड्स यावर पूर्वी प्रमाणे 10 टक्क्यांचे रिवार्ड पॉईंट्स मिळतील.
केवायसी (KYC) आवश्यक
1 जानेवारी 2023 पासून इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी केवायसी आवश्यक असणार आहे. हा नियम लाइफ इन्शुरन्स, मोटर इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्सवर लागू होणार आहे. नवीन वर्षात कोणतीही इन्शुरन्स पॉलिसी घेण्यापुर्वी कंपनीला ग्राहकांकडून ही कागदपत्र घेणे बंधनकारक असेल. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सुचनेनुसार हा बदल होणार आहे.
‘एनपीएस’ च्या नियमात होणार बदल
1 जानेवारी 2023 पासून ‘एनपीएस’मधील आंशिक रक्कम ऑनलाईन काढता येणार नाही. पेन्शन फंड रेगुलॅरिटी अँड डेव्हलेपमेंट अथॉरिटीकडून ही सुविधा लॉकडाउन दरम्यान सुरू करण्यात आली होती, जी आता बंद करण्यात येणार आहे. हा नियम केंद्र सरकार, राज्य सरकार, इतर सरकारी संस्थेतील कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे.