Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Year End Tax Tips: 2022 वर्ष संपतंय; त्यापूर्वी टॅक्सशी संबंधित सर्व कामे पूर्ण करून घ्या!

Year End Tax Tips

2022 Year End Tax Tips: नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या नादात 2022 मध्ये तुमच्या पैशांशी संबंधित राहिलेली कामे अगोदर पूर्ण करावा. नाहीतर नवीन वर्षाच्या सुरूवातीला दंड भरावा लागेल.

2022 च्या वर्षातील शेवटचा महिना सुरू झाला आहे. नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करा. मात्र तत्पूर्वी टॅक्शी संबंधित 2022 मध्ये राहिलेली कामे अगोदर पूर्ण करा. विलंब शुल्कासह आयटीआर रिटर्न भरणे, आयटीआरमधील चुका दुरुस्त करणे, जीएसटी रिटर्न-9 सी, तसेच फायलिंग आणि अ‍ॅडव्हान्स टॅक्सचा तिसरा हप्ता या गोष्टींचा विचार करायला हवा. यापैकी कोणतेही काम अर्धवट सोडले तर तुम्हाला दंड भरावा लागेल. त्याचवेळी अतिरिक्त व्याज देखील भरावे लागेल. अन्यथा कायदेशीर नोटीसही येऊ शकते. अशा अडचणी नव्या वर्षाच्या आनंदावर विरजण घालू शकतात. याबाबत थोडी सजगता बाळगली तर तुमचा यापासून बचाव होऊ शकतो.

विलंब शुल्कासह इन्कम टॅक्स भरणे (Income Tax Return with Late Fee)

तुम्ही जर 2021-22 या आर्थिक वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return-ITR) अजून भरलेले नसेल तर विलंब शुल्कासह (Late Fee) 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न भरू शकता. तुमचे एकूण उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला 1 हजार रुपये विलंब शुल्क द्यावे लागेल आणि जर तुमचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा अधिक असेल तर 5 हजार रुपयांचे विलंब शुल्क भरावा लागेल.

अ‍ॅडव्हान्स टॅक्सचा तिसरा हप्ता (Third Quarterly Advance Tax)

2022-23 च्या अ‍ॅडव्हान्स टॅक्सचा तिसरा हप्ता भरण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर आहे. दहा हजार रुपयांपेक्षा अधिक वार्षिक प्राप्तीकर भरणार्‍यांना अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरावा लागतो. 15 डिसेंबरपर्यंत 75 टक्के अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरला नाही किंवा कमी टॅक्स जमा करत असाल तर 1 टक्के व्याज आकारणी होईल.

आयटीआरमधील चुकांची दुरुस्ती (Corrections of Errors in ITR)

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये प्राप्तीकर विवरणपत्र दाखल केलेले असेल आणि त्यात काही त्रुटी राहिल्या असतील तर 31 डिसेंबरपर्यंत सुधारित आयटीआर दाखल करू शकता. त्यानंतर चूक दुरुस्ती करता येणार नाही. या कारणामुळे कदाचित आपल्याला इन्कम टॅक्स विभागाची नोटीस येऊ शकते.

जीएसटीआर-9 सी दाखल करणे (Filing of GSTR-9C)

जीएसटी नोंदणीकृत करदात्यांना प्रत्येक आर्थिक वर्ष संपल्यानंतर वार्षिक आयटीआर जीएसटीआर-9 दाखल करावे लागते. गरज भासल्यास त्यात दुरुस्तीसह जीएसटीआर-9 सी देखील जमा करता येते. 2021 -22 साठी त्याची शेवटची तारीख 31 डिेसेंबर आहे. त्यानंतर रिटर्न दाखल केल्यास दररोज 200 रुपये याप्रमाणे विलंब शुल्क भरावा लागतो. हे शुल्क टर्नओव्हरच्या कमाल 0.5 टक्क्यांपर्यंत आकारले जावू शकते. जीएसटीआर-9 सी विवरणपत्र हे एका वर्षात पाच कोटीपेक्षा अधिक उलाढाल असणार्‍या व्यापारी, उद्योजकांसाठी आहे.